1 हा अंक अभिव्यक्तीचा निदर्शक आहे आणि शिक्षकांसाठीचं कॉम्बिनेशन आहे. विद्यार्थ्यांना किंवा समोरच्या श्रोत्यांना विषय समजण्यासाठी त्यांना समजेल अशा भाषेत व्यक्त व्हावं लागतं. शिकण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांसाठी रंजक होण्याकरिता क्रिएटिव्हिटी आणि नावीन्यपूर्ण कल्पनांचा वापरही आवश्यक असतो.
विचारांचा प्रवाह निर्माण होणं शिक्षकांसाठी आवश्यक असतं. तो 1 या अंकामुळे प्राप्त होतो. तसंच हा अंक नेतृत्वगुण आणि सभाधीटपणाही देतो.
3 हा अंकही व्यक्त होण्याची क्षमता आणि खासकरून वक्तृत्व गुण देतो. हे गुण शिक्षकी पेशासाठी आवश्यक असतात. नातेसंबंध तयार करण्याच्या दृष्टीनेही 3 हा अंक आवश्यक असतो. शिक्षकांचे विद्यार्थ्यांशी बंध तयार होणं, ते त्यांच्याशी जोडलं जाणं आवश्यक असतं.
3 हा अंक सक्रियता देतो. त्यामुळे मनुष्य खूप क्रियाशील होतो. 50 किंवा त्याहून अधिक विद्यार्थ्यांना सामोरं जाण्याची क्षमता त्याच्याकडे येते, अशा शिक्षकांना कल्पनांची कमतरता भासत नाही, ते सोशल असतात.
शिक्षकांना 9 या अंकाचं सामर्थ्यही आवश्यक असतं. कारण शिक्षकांकडे धैर्य आणि ऊर्जाही असावी लागते. शिक्षक काळजी घेण्याच्या वृत्तीचे असावे लागतात आणि इतरांची सेवा करण्याचा भावही त्यांच्यामध्ये असावा लागतो. हे गुण या अंकांशी निगडित असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांशी दीर्घ काळ टिकणारे नातेसंबंध विकसित व्हायला मदत होते.
आता यातल्या किमान 2 अंकांचं कॉम्बिनेशन तुमच्या जन्मतारखेत असेल, तर तुम्ही उत्तम शिक्षक बनू शकता. तुमच्या जन्मतारखेत नसलेले यातले अंक मोबाइल नंबरमध्ये येतील असं पाहा. त्यामुळे शिक्षक म्हणून तुमचं करिअर उत्तम होऊ शकेल.