NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / स्वाहा-स्वाहा-स्वाहा..! होम, यज्ञ, मोठ्या पूजांमध्ये हा एक शब्द वारंवार का उच्चारला जातो?

स्वाहा-स्वाहा-स्वाहा..! होम, यज्ञ, मोठ्या पूजांमध्ये हा एक शब्द वारंवार का उच्चारला जातो?

हिंदू धर्मात पूजा आणि हवनाला खूप महत्त्व आहे. पौराणिक काळापासून ऋषी, संत, राजे, सम्राट मोठमोठे यज्ञ आणि पूजा पाठ करत आले आहेत. हिंदू धर्मात हवनाला खूप महत्त्व आहे. जवळजवळ प्रत्येक महत्त्वाच्या पूजेनंतर हवन केलं जातं. हवन करताना 'स्वाहा' हा शब्द वापरला जातो हेही तुम्ही पाहिले असेल. अशा वेळी काहींच्या मनात हा विचारही येऊ शकतो की हवन करताना वारंवार 'स्वाहा' का म्हणतात. स्वाहा चा अर्थ काय? आज आम्ही तुम्हाला हवन करताना स्वाहा जपण्याची कारणे सांगणार आहोत.

15

प्राचीन काळापासून यज्ञवेदीमध्ये काही अर्पण करताना स्वाहा हा शब्द वापरला जात आहे. जेव्हा जेव्हा हवन असतो तेव्हा हवन कुंडात यज्ञवेदीमध्ये स्वाहा म्हणत हवन सामग्री अर्पण केली जाते. असे मानले जाते की, हवन सामग्रीचा नैवेद्य अग्नीद्वारे देवतांना नेला जातो.

25

धार्मिक मान्यतेनुसार, जोपर्यंत हवन सामग्री देवतेने स्वीकारली नाही तोपर्यंत कोणताही हवन किंवा यज्ञ यशस्वी मानला जात नाही. आणि जेव्हा अग्नीद्वारे स्वाहा केले जाते तेव्हाच देव या अर्पण केल्या जाणाऱ्या गोष्टी स्वीकारतात, असे मानले जाते.

35

पौराणिक कथा काय सांगते - ज्योतिषाचार्य पंडित रामानुज शुक्ल यांच्या मते, पौराणिक कथांमध्ये स्वाहा ही अग्निदेवाची पत्नी असल्याचे सांगितले आहे. अशा रीतीने हवनाच्या वेळी स्वाहा शब्दाचा जप करताना अग्निदेवाच्या माध्यमातून हवन साहित्य देवतांना पाठवले जाते.

45

पुराणांमध्ये असा उल्लेख आहे की, ऋग्वेद काळात देव आणि मानव यांच्यामध्ये अग्नी हे माध्यम म्हणून निवडले गेले होते.

55

तसेच अग्नीमध्ये जी काही सामग्री मिळते ती पवित्र होते. स्वाहा म्हणत अग्नीत अर्पण केलेले सर्व साहित्य देवतांपर्यंत पोहोचते. श्रीमद भगवतगीता आणि शिवपुराणात यासंबंधी अनेक कथा सांगितल्या आहेत. त्यामुळे हवन करताना स्वाहा या शब्दाचा उच्चार केला जातो. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

  • FIRST PUBLISHED :