वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य 17 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 1.23 वाजता सिंह राशीत प्रवेश करत आहे. सूर्य सिंह राशीत गेल्याने खालील राशींना लाभ होईल.
मिथुन - या राशीमध्ये सूर्य तिसऱ्या भावात असेल. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो, नोकरदार लोकांच्या कामाचे कौतुक होईल. यासोबतच प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. बरेच दिवस थांबलेले काम पुन्हा सुरू होऊ शकते. कुटुंब किंवा मित्रांसोबत संस्मरणीय सहलीला जाऊ शकता.
कर्क - या राशीमध्ये सूर्याचा दुसऱ्या घरात प्रवेश होत आहे. हे घर बचत, वाणी आणि संसाराचे घर मानले जाते. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरदार लोकांच्या जीवनात अनेक आनंदी प्रसंग येऊ शकतात. कुटुंबाचा सहवास चांगला राहील आणि ते तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील. पण तुमच्या बोलण्यावर आणि वागण्यावर थोडंसं नियंत्रण ठेवा कारण ते तुमचे नाते बिघडवण्याचे कारण ठरू शकते.
सिंह - या राशीमध्ये सूर्याचा लग्न भावात प्रवेश होत आहे. सूर्य हा सिंह राशीचा स्वामी ग्रह आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांचे आरोग्य, ऊर्जा आणि आत्मविश्वास या काळात चांगला राहू शकतो. तुमच्या कामाच्या जोरावर तुम्हाला यश मिळू शकते.
सिंह राशीला अनेक नवीन सुवर्णसंधीही मिळू शकतात, ज्या पकडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आरोग्य चांगले राहील. इतरांना मदत करून तुम्ही सर्वांची मने जिंकू शकता.
तूळ - तूळ राशीच्या अकराव्या घरात सूर्य प्रवेश करेल. हे घर इच्छा, धन लाभ, वडील, कुटुंबातील इतर सदस्यांशी संबंधित मानले जाते. सूर्याचा सिंह राशीत प्रवेश या राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. समाजात मान-सन्मान वाढेल. बरेच दिवस थांबलेले काम पुन्हा सुरू होऊ शकते. तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि तुम्हाला आर्थिक लाभासोबतच व्यवसायात प्रचंड यश मिळेल. कुटुंब आणि मुलांसोबत चांगला वेळ जाईल.