NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / Pitrudosh: पितृ-कालसर्पदोष मुक्तीसाठी सोमवती अमावस्या आहे खास; या उपायांनी दिसेल परिणाम

Pitrudosh: पितृ-कालसर्पदोष मुक्तीसाठी सोमवती अमावस्या आहे खास; या उपायांनी दिसेल परिणाम

Pitrudosh: हिंदू धर्मात अमावस्येला खूप धार्मिक महत्त्व आहे. सोमवारी येणाऱ्या अमावस्याला सोमवती अमावस्या म्हणतात. या महिन्यात 17 जुलै रोजी दर्श सोमवती ठाणवयी अमावस्या आहे. या दिवशी दान आणि पवित्र स्नान केल्यानं पुण्य प्राप्त होतं, अशी धार्मिक श्रद्धा आहे. सोमवती अमावस्येला भगवान शिव आणि गौरींची पूजा केल्यानं सौभाग्य, दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभते, असे मानले जाते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने मोक्ष प्राप्त होतो. या दिवशी पितरांना जल अर्पण करून पितृदोषापासून मुक्ती मिळते. यासोबतच या दिवशी काही उपाय केल्याने कालसर्प दोषासह इतर समस्यांपासून मुक्ती मिळू शकते.

15

सोमवती अमावस्येच्या दिवशी हे उपाय करा ज्योतिष शास्त्रानुसार, सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळाला जल अर्पण करा. यानंतर पाच प्रकारच्या गोड पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा. त्यानंतर ध्यान करताना विष्णूची पूजा करा आणि दिवा लावा. यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करताना झाडाला किमान 21 परिक्रमा करा. यामुळे पितृदोषापासून सुटका होईल.

25

- ज्योतिषशास्त्रानुसार, सोमवती अमावस्येच्या दिवशी दक्षिण दिशेला तोंड करून पितरांसाठी तर्पण करावे आणि पितृस्तोत्राचे पठण करावे. यामुळेही पितृदोषापासूनही मुक्ती मिळते.

35

- ज्योतिष शास्त्रानुसार सोमवती अमावस्येच्या दिवशी कोळशाची धुनी दक्षिण दिशेला लावल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते.

45

- सोमवती अमावस्येच्या दिवशी खिरीमध्ये केशर टाकून पितरांची पूजा केल्यानं आणि पितरांची माफी मागून पितृदोषापासून मुक्ती मिळते.

55

- ज्योतिष शास्त्रानुसार, सोमवती अमावस्येच्या दिवशी ज्या व्यक्तीच्या कुंडलीत काल सर्प दोष असेल त्यांनी भगवान शंकराची पूजा करावी. भगवान शंकराच्या पूजेसोबत रुद्राभिषेक करावा. यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि कालसर्प दोषाचा अशुभ प्रभावही कमी होतो. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

  • FIRST PUBLISHED :