परंतु काही लोक हनुमान चालिसाचे पठण करताना नकळत चुका करतात, ज्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात. आपण त्या चुकांबद्दल जाणून घेऊया ज्या करणे हनुमान चालिसा म्हणताना टाळाव्यात.
हनुमान चालिसाचे पठण करताना काय करू नये - हनुमान चालिसाचे पठण करताना कोणत्याही प्रकारची नकारात्मकता मनात आणू नका. यामुळे हा पाठ पूर्ण मानला जात नाही. जर तुम्ही हनुमानाचे भक्त असाल तर कोणत्याही दुर्बल व्यक्तीला कधीही त्रास देऊ नका किंवा कोणत्याही प्रकारचे अपशब्द वापरू नका, यामुळे हनुमान चालीसा पाठ करूनही उपयोग होत नाही.
याशिवाय हनुमान चालिसाचे पठण करताना तुम्ही तुमचे संपूर्ण मन मारुतीच्या भक्तीमध्ये झोकून द्यावे. पाठ सुरू असताना कोणाशीही संवाद करू नका अन्यथा हनुमान चालीसा फलदायी होणार नाही.
शनिवारी हनुमान चालिसेचे 3 वेळा पठण करणे शुभ मानले जाते. चालिसा पाठ करण्यापूर्वी हनुमानासमोर पाण्याने भरलेले भांडे ठेवा, हनुमान चालिसाचे पठण झाल्यावर ते पाणी प्या.
चालीसा पाठ करण्यापूर्वी श्रीगणेशाचे ध्यान करणे आवश्यक आहे. यासोबत कुळातील देवतांचेही स्मरण करावे. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)