NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / देवी लक्ष्मीच्या कृपेनं होईल सगळं सुरळीत; शुक्रवारी करण्याचे हे उपाय आहेत खास

देवी लक्ष्मीच्या कृपेनं होईल सगळं सुरळीत; शुक्रवारी करण्याचे हे उपाय आहेत खास

हिंदू धर्मात देवतांचे वेगवेगळे दिवस ठरलेले आहेत. आठवड्यातील प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा केली जाते. त्याप्रमाणे शुक्रवार हा धनाची देवी लक्ष्मीचा दिवस मानला जातो. या दिवशी..

15

जीवनात आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असेल, कठोर परिश्रम करूनही पैसा राहत नसेल, सुख-शांती मिळत नसेल तर शुक्रवारी लक्ष्मीची विशेष पूजा करावी. लक्ष्मीची पूजा केल्यानं घरात ऐश्वर्य आणि समृद्धी येते. पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्याकडून जाणून घेऊया शुक्रवारचे उपाय.

25

शुक्रवारच्या उपायाचे फायदे - शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने घरात सकारात्मक उर्जा संचारते आणि पैशाशी संबंधित समस्या दूर होतात, असे मानले जाते. वैवाहिक जीवनात आनंद राहण्यासाठी, देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी शुक्रवारी काही उपाय अवश्य करावेत.

35

अशा गोष्टी करा - ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारी काळ्या मुंग्यांना साखर खाऊ घालावी. असे केल्याने पैशाची अडचण दूर होते आणि अडकलेले काम पूर्ण होते. तसेच कोणाची वाईट नजर, दृष्ट लागली असल्यास शुक्रवारी मातीच्या दिव्यात दोन कापूर जाळावेत. हा दिवा घरभर फिरवा आणि बाहेर ठेवा. असे केल्याने वैवाहिक जीवनात गोडवा वाढतो.

45

शुक्रवारी 'ग्राम ग्रीम ग्रूम सह शुक्राय नमः' या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे नातेसंबंध मजबूत होतात. तसेच कुटुंबावरील आर्थिक संकट दूर होते.

55

वैवाहिक जीवनात मधुरता वाढेल - वैवाहिक जीवनात आनंद हवा असेल तर शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा. देवीला लाल कपडे, लाल चुनरी, लाल बिंदी, लाल बांगड्या अर्पण करा. देवी लक्ष्मीच्या चरणी फुले, मखाणा इत्यादी अर्पण करा. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करते, असे मानले जाते. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

  • FIRST PUBLISHED :