NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / PHOTO : साईंच्या झोळीत थेट युरोपच्या भक्ताकडून हिरेजडित मुकुट अर्पण, किंमत वाचून व्हाल थक्क..

PHOTO : साईंच्या झोळीत थेट युरोपच्या भक्ताकडून हिरेजडित मुकुट अर्पण, किंमत वाचून व्हाल थक्क..

युरोप येथील साईभक्ताने साईबाबांच्या चरणी मोठी देणगी अर्पण केली आहे.

17

शिर्डी येथील साईबाबांच्या दानपेटीत कोव्हिड कालावधीनंतर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत असून या काळात भाविकांच्या संख्येतही वाढ झाली आहे.

27

साईबाबांच्या दानपेटीत मागील ऑक्टोबर 2021 पासून ते नोव्हेंबर 2022 या वर्षभरात 398 कोटी रुपयांपेक्षा जास्त भरभरून दान जमा झाले आहे. सुमारे अडीच ते तीन कोटी भाविकांनी साईदरबारी हजेरी लावली आहे.

37

आज थेट युरोपमधील एका साईभक्ताने बाबांना हिरेजडीत मुकुट अर्पण केला आहे.

47

368 ग्रॅम वजन असलेल्या हिरेजडीत सुवर्ण मुकुटाची किंमत जवळपास 28 लाख रुपये इतकी आहे.

57

किनारी सुबिर पटेल राहणार युरोप या साईभक्ताने हा मुकूट साई चरणी अर्पण केला आहे.

67

अतीशय सुंदर नक्षीकाम केलेला मुकूट अर्पण केल्याची माहिती साई संस्थानचे प्रशासकीय मुख्य लेखाधिकारी कैलास खराडे यांनी दिली आहे.

77

देशातील नंबर एकचे तिर्थक्षेत्र तिरुपती बालाजी देवस्थानच्या तुलनेत साईबाबांच्या चरणी चाळीस टक्के दान जमा झाले आहे. तिरुपती बालाजी देवस्थानचे वार्षिक दान जवळपास एक हजार कोटी रुपयांच्या घरात असते. त्या तुलनेत देशात तिरुपतीनंतर शिर्डीच्या साईबाबांचा नंबर लागतो. हळूहळू या दानाचा आकडा वाढतच चालला आहे. यंदाच्या वर्षातील एवढे मोठे दान हा साईबाबा संस्थानच्या इतिहासात विक्रमच आहे.

  • FIRST PUBLISHED :