NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / अस्ताला जाणारा शनी या राशीच्या लोकांना अडचणीत आणेल; महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला

अस्ताला जाणारा शनी या राशीच्या लोकांना अडचणीत आणेल; महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला

न्याय आणि कर्माचं फळ देणारी शनिदेवता सध्या कुंभ राशीत आहे. 17 जानेवारीला शनीने कुंभ राशीत प्रवेश केलाय. आता 31 जानेवारी रोजी पहाटे 02.46 वाजता शनि कुंभ राशीतून अस्ताला जाईल. शनि 33 दिवस कुंभ राशीत राहील. त्यानंतर 05 मार्च रोजी रात्री 08.46 वाजता उदय होईल. शनीच्या अस्तामुळे 12 पैकी 5 राशीच्या लोकांनी काळजी घ्यावी. त्यांच्यावर नोकरी, व्यवसाय, आरोग्य इत्यादी क्षेत्रात संकटाचे ढग दाटून येऊ शकतात.

16

तिरुपतीचे ज्योतिषाचार्य डॉ. कृष्णकुमार भार्गव सांगतात की 31 जानेवारीला शनि अस्तामुळे काही राशीच्या लोकांना सावध राहून काम करावं लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. शनीच्या अस्तामुळे या 5 राशींच्या जीवनावर काय परिणाम होतील ते जाणून घेऊया.

26

मेष: या राशीच्या लोकांना शनीच्या अस्तामुळे करिअर आणि वैवाहिक जीवनात सतर्क राहावे लागेल. धनहानी होऊ शकते. या काळात तुमच्या करिअरमध्ये नवीन आव्हाने येऊ शकतात. कठीण प्रसंगांना मोठ्या संयमाने सामोरं जावं लागेल. 31 जानेवारी ते 05 मार्च या कालावधीत गुंतवणुकीसंबंधी निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घ्या. असं कोणतेही काम करू नका, ज्यामुळे तुमचा सन्मान दुखावला जाईल.

36

कर्क : तुमच्या राशीवर शनीची साडेसाती चालू आहे. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांना काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. या राशीच्या लोकांनी अनावश्यक चर्चा आणि कार्यालयीन राजकारणापासून दूर राहावे. भागीदारी व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनातही काळजी घ्या. असे कोणतेही काम किंवा विषय काढू नका, ज्यामुळे जोडीदाराशी वाद होऊ शकतो.

46

सिंह : शनीच्या अस्ताचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. खानपानात काळजी घ्या. आरोग्याच्या किरकोळ समस्यांकडेही दुर्लक्ष करू नका. या काळात तुमची आर्थिक स्थिती तणावपूर्ण असू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना धनहानी होऊ शकते. कुठेतरी हुशारीने गुंतवणूक करा. आवश्यक नसल्यास, आताची गुंतवणूक पुढे ढकलू द्या.

56

वृश्चिक: शनीच्या अस्तामुळे तुमच्या कुटुंबातील नातेसंबंधांवर परिणाम होऊ शकतो. भाऊ-बहिणीचे नाते बिघडू शकते. वादाची परिस्थितीही निर्माण होऊ शकते. संयमाने काम करा. व्यवसायात काहीतरी नवीन करून पहायचे असेल तर आता करू नका, अन्यथा आर्थिक स्थिती बिघडू शकते. 05 मार्च नंतरच काहीतरी नवीन करण्याचा विचार करा.

66

कुंभ: शनि हा तुमच्या राशीचा अधिपती ग्रह आहे आणि तो या राशीतून अस्ताला जात आहे. या काळात आपण सावध असणे आवश्यक आहे. सध्या तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तसे करू नका, तुम्ही जिथे असाल तिथे मेहनत करा. दबावाखाली नोकरी सोडू नका. यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. त्यामुळे, कौटुंबिक संबंध आणि वैवाहिक जीवन दोन्ही प्रभावित होऊ शकतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवावे.

  • FIRST PUBLISHED :