शनिवार हा न्यायदेवता शनिदेवाला समर्पित मानला जातो. या दिवशी शनिदेवाची विधीपूर्वक पूजा केली जाते. हिंदू धर्माच्या धर्मग्रंथात शनिदेवाला न्यायाधीश म्हटले आहे. शनिदेवाला न्याय देवता मानले गेले आहे. शनिदेवाची कृपा असेल तर व्यक्तीचे जीवन आनंदानं भरून जातं, परंतु शनिदेव जर एखाद्यावर कोपला तर त्याचे मोठे नुकसानही करतात. (इमेज क्रेडिट: कॅनव्हा)
काळे कपडे आणि जोडे : शनिवारी काळे कपडे आणि जोडे दान करणे खूप शुभ मानले जाते. जर तुम्हाला आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही काळे वस्त्र दान करावे. शनिवारी संध्याकाळी एखाद्या गरीब व्यक्तीला काळे कपडे आणि जोडे दान केल्यानं आरोग्यास लाभ होतो. (इमेज क्रेडिट: कॅनव्हा)
धान्य : जर एखाद्या व्यक्तीला जीवनात खूप त्रास होत असेल आणि शनिदोष असेल तर त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी दर शनिवारी 6 प्रकारचे धान्य दान करावे. यासाठी गहू, तांदूळ, हरभरा, मका, ज्वारी आणि काळे उडीद दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. (इमेज क्रेडिट: कॅनव्हा)
काळे तीळ आणि काळे उडीद : जर तुम्हाला पैशांशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत असेल तर काळे तीळ आणि काळे उडदाचे दान करणे खूप शुभ मानले जाते. शनिवारी संध्याकाळी 1.25 किलो काळे उडीद डाळ किंवा काळे तीळ एखाद्या गरीब व्यक्तीला दान करणे खूप फायदेशीर मानले जाते. असे मानले जाते की यामुळे शनिमुळे होणाऱ्या पैशाशी संबंधित समस्या सुटतील. (इमेज क्रेडिट: कॅनव्हा)
लोखंडी भांडी : शनिवारी लोखंडाचे दान करणे खूप शुभ मानले जाते. शनिवारी लोखंड खरेदी करणे शुभ मानले जात नाही, परंतु त्याचे दान केल्यास शनिदोषापासून मुक्ती मिळते. (इमेज क्रेडिट: कॅनव्हा)
मोहरीचे तेल : शनिवारी मोहरीच्या तेलाचे दान करणे खूप फायदेशीर मानले जाते. या दिवशी मोहरी दान केल्यानं रखडलेली कामे पूर्ण होतात. यासाठी शनिवारी सकाळी लोखंडाच्या भांड्यात मोहरीचे तेल घेऊन त्यात एक नाणे टाकावे. मग ते एखाद्या गरीबाला दान करा किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवा. यामुळे शनिदेव खूप प्रसन्न होतील. (इमेज क्रेडिट: कॅनव्हा) (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)