संकष्ट चतुर्थी 11 डिसेंबर, रविवारी आहे. या दिवशी तीन शुभ योग तयार होत आहेत. संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने भक्तांची संकटे दूर होतात आणि गणेशाच्या आशीर्वादाने जीवनात सुख, शांती आणि यश प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे.
चतुर्थी व्रताच्या पूजेमध्ये चंद्रोदयाला महत्त्व आहे, त्यामुळे 11 डिसेंबर रोजी चतुर्थी तिथीला चंद्रोदय होत आहे, त्यामुळे संकष्टी चतुर्थी व्रत 11 डिसेंबर रोजी पाळण्यात येणार आहे.
मुंबई - आठ वाजून चाळीस मिनिटे, अमरावती - आठ वाजून पंधरा मिनिटे, अहमदनगर - आठ वाजून 32 मिनिटे
औरंगाबाद - आठ वाजून 28 मिनिटे, कोल्हापूर - आठ वाजून 39 मिनिटे, जळगाव - आठ वाजून 24 मिनिटे
चंद्रपूर - आठ वाजून अकरा मिनिटे, जालना - आठ वाजून पंचवीस मिनिटे, लातूर - आठ वाजून 26 मिनिटे
नाशिक - आठ वाजून 34 मिनिटे, नागपूर - आठ नऊ मिनिटे, नांदेड - आठ वाजून वीस मिनिटे
पुणे - आठ वाजून 37 मिनिटे, रत्नागिरी आठ वाजून 42 मिनिटे, सातारा आठ वाजून 38 मिनिटे
सांगली - आठ वाजून 37 मिनिटे, पणजी- आठ वाजून 44 मिनिटे, सोलापूर - आठ वाजून तीस मिनिटे
बेळगाव आठ वाजून 40 मिनिटे, ठाणे आठ वाजून 39 मिनिटे, यवतमाळ आठ वाजून पंधरा मिनिटे
उस्मानाबाद आठ वाजून 26 मिनिटे, सावंतवाडी आठ वाजून त्रेचाळीस मिनिटे, धुळे- आठ वाजून 27 मिनिटे