NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / Gajkesari Yog 2023: गजकेसरी योग जुळून आल्यानं या 3 राशींची चांदी! नवीन नोकरी, धनलाभ होईल

Gajkesari Yog 2023: गजकेसरी योग जुळून आल्यानं या 3 राशींची चांदी! नवीन नोकरी, धनलाभ होईल

Gajkesari Yog 2023: बुधवारी 24 मे रोजी सकाळी 08:27 पासून गजकेसरी योग तयार झाला आहे, तो आता 26 मे रोजी रात्री 08:50 वाजेपर्यंत असेल. याशिवाय 24 मे रोजी रवि योगही तयार झाला आहे. शिवाय आज 25 मे रोजी रविपुष्य योग, सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग आणि अमृत सिद्धी योग तयार होत आहे. तसेच 26 मे रोजी सकाळपासून संध्याकाळपर्यंत रवि योग राहील. तयार झालेला गजकेसरी योग 3 राशीच्या लोकांना तीन दिवस शुभ फळ देईल. जाणून घेऊया गजकेसरी योगामुळे कोणत्या 3 राशींना फायदा होणार आहे.

15

गजकेसरी योग 2023 श्री कल्लाजी वैदिक विद्यापीठाच्या ज्योतिष विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा चंद्र आणि गुरु एका राशीमध्ये एकत्र असतात किंवा गुरू ज्या राशीत असतो त्याच्या चौथ्या, सातव्या आणि दहाव्या घरात चंद्र आल्यास गजकेसरी योग तयार होतो.

25

हा योग अतिशय शुभ योग मानला जातो. काल 24 मे रोजी सकाळी 08:27 ते 26 मे रोजी रात्री 08:50 पर्यंत चंद्र कर्क राशीत आणि गुरु मेष राशीत आहे. गुरू आणि चंद्राच्या या स्थितीतून गजकेसरी योग तयार झाला आहे.

35

गजकेसरी योग 2023 मुळे 3 राशींना फायदा - मेष: तुमच्या राशीच्या लोकांना पैसा मिळेल. नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. तुमचे उत्पन्न वाढू शकते, नोकरदार लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुमचा बॉसही खूप खूश असेल. सरकारकडून तुम्हाला लाभाच्या संधी मिळू शकतात. व्यवसायात लाभ होईल.

45

मिथुन : गजकेसरी योगामुळे तुमची यश व कीर्ती वाढणार आहे. अचानक पैसा आणि धनलाभ होण्याचे योग आहेत. तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन खरेदी करू शकता. सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. धनलाभाचा काळ आहे, तुमची आर्थिक बाजू चांगली राहील. आवडीचे जेवण मिळेल. कोणत्याही नकारात्मक विचारांना मनात थारा देऊ नका. तुमचे काम पूर्ण होत राहील.

55

तूळ : तुमच्या राशीचे जे लोक व्यवसाय करतात, त्यांना गजकेसरी योगामुळे चांगला नफा मिळेल. नोकरीत यश मिळेल. तुमच्या जोडीदाराकडून काही चांगली बातमी मिळू शकते. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठीही काळ चांगला आहे. नोकरीत उच्च अधिकारी तुमच्यावर खुश राहतील, जे फायदेशीर ठरेल. तुमचे आरोग्य चांगले राहील. सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकते.

  • FIRST PUBLISHED :