वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. ही दिशा पितरांसाठी योग्य मानली जाते. म्हणूनच लक्षात ठेवा की, घरात पूर्वजांचा फोटो नेहमी उत्तर दिशेला लावावेत. म्हणजे पितरांचे तोंड दक्षिण दिशेला असावे.
त्याचबरोबर पूर्वजांचा फोटो बेडरूममध्ये किंवा ड्रॉईंग रूममध्ये ठेवू नये. असे मानले जाते की, या ठिकाणी पूर्वजांचे फोटो ठेवल्याने घरातील लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. यासोबतच कुटुंबात अनेक प्रकारचे आजार उद्भवू लागतात.
घरात एकापेक्षा जास्त पूर्वजांचे फोटो लावू नयेत हेही लक्षात ठेवा. घरात एकापेक्षा जास्त पितरांचा फोटो असल्यास नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते.
पितरांचे श्राद्ध वगैरे केले नाही, तसेच त्यांचे स्मरण केले नाही, तर त्यांना राग येतो. यासोबत पितृदोषही निर्माण होतो. घराच्या देव्हाऱ्यात किंवा स्वयंपाकघरात पूर्वजांची चित्रे लावू नयेत.
पितरांचे वेळोवेळी स्मरण करून त्यांचे श्राद्ध वगैरे केल्यास ते आनंदी होतात. असे केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. त्यामुळे कुटुंबातील माणसांचे आयुष्य आनंदाने व्यतीत होते. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)