8 मूल्यांकच्या लोकांवर शनी ग्रहाचा विशेष प्रभाव असतो. सूर्य पुत्र आहेत शनी. तरीदेखील ते एकमेकांचे शत्रू आहेत.
8 मूल्यांकचे लोक धीर गंभीर संयमी स्वभावाचे असतात. खूप मेहनती असतात हे लोक. सतत कामात राहतात हे लोक.
कामात खूप चिवट असतात. गंभीर स्वभावाचे असतात. यांना हळूहळू सफलता मिळते. यांना वाचनाचीही आवड असते.
साध्या सरळ स्वभावाचे असल्यामुळे त्यांची प्रगती हळू हळू कमी प्रमाणात होते, यांच्यात फसवे गिरीची वृत्ती नसते.
खूप कुशाग्र बुद्धीचे असतात. कोणावर अवलंबून नसणारे असतात. कोणतही काम प्रामाणिकपणे करतात. हे लोक डॉक्टर, आयटी, सर्जन, ज्योतिषी या क्षेत्रात अग्रेसर असतात.
जर तुमच्या जन्म दिवसाची बेरीज 8 येत असेल म्हणजेच तुमचा जन्म हा कोणत्याही महिन्याच्या 8,17,26 या तारखेला झाला असेल तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.