क्रमांक 1 : क्रमांक 5 आणि क्रमांक 1 असलेल्या व्यक्ती तितक्याच प्रतिभावान आणि यशस्वी असल्याने त्या सहसा एकत्र काम करायला तयार होत नाहीत.
परंतु, 1 हा क्रमांक 5 क्रमांक असलेल्यांसाठी अत्यंत लकी ठरत असल्याने अशा व्यक्ती एकमेकांच्या सहवासात राहून आकाशाला गवसणी घालू शकतात.
हे क्रमांक असलेल्या विवाहित जोडप्यांमधल्या संघर्षाचं सर्वांत मोठं कारण म्हणजे एक प्रकारचं वर्चस्व होय. हे कारण वैवाहिक जीवनात मुख्य भूमिका बजावतं.
क्रमांक 5 आणि क्रमांक 1 असलेल्या व्यावसायिक भागीदारांना त्यांच्या व्यवसायात अनेक चढ-उतार पाहावे लागतात आणि या व्यक्ती नेतृत्व करतात.
या क्रमांकाच्या व्यक्ती क्रीडा, राजकारण, ट्रॅव्हल एजन्सी, ऑटोमोबाइल, आयटी, सौर ऊर्जा, बांधकाम, जाहिरात, ज्वेलरी, परकीय कमोडिटीज, अभिनय या क्षेत्रांमध्ये चांगली प्रसिद्धी आणि यश मिळवू शकतात.
#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)