कुंडलीतील त्यांची स्थिती बघून हे संबंध ठरतात. क्रमांक एक आणि सातचा प्रभाव असलेल्या व्यक्तींमधील नातेसंबंध समजणं फार कठीण आहे.
कारण, ते नेहमीच सुप्त असतात. दोन्ही क्रमांकाच्या व्यक्ती परस्पर डील्स करताना सावध आणि हातचं राखून वागताना दिसतात.
पण, दोघांकडे विश्लेषणात्मक कौशल्ये, संशोधन क्षमता, परिपूर्णता, नेतृत्व, तंत्रज्ञानाची आवड आणि आत्मनिरीक्षण यांसारखी काही उत्कृष्ट वैशिष्ट्ये असतात.
दोघांमधील हे सर्व गुण मिळून एक मजबूत व्यवसाय किंवा राजकीय कारकीर्द तयार होऊ शकते. एक जन्मांक असलेल्या व्यक्ती क्रमांक सातबरोबर चांगली भागीदारी करू शकतात.
पण, वैयक्तिक जीवनात ही भागीदारी निभावणं कठीण आहे. कारण, दोघेही नातेसंबंधात पारदर्शकता ठेवण्यास अयशस्वी ठरतात.
म्हणून, अशा विवाहित जोडप्यांनी परस्परांना समजून घेण्याचा आणि परस्पर विश्वास निर्माण करण्याचा अधिक प्रयत्न करणं गरजेचं आहे.
#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)