क्रमांक 7 : क्रमांक 7 हा केतूचं प्रतिनिधित्व करतो. या अंकाचा प्रभाव असलेल्या व्यक्तीला आपल्या जीवनात ज्ञान वाढवण्यासाठी अनेक प्रकारचं नुकसान सोसावे लागतं; पण अशा व्यक्तीला क्रमांक सहाचा पाठिंबा मिळाला तर तिचं जीवन खूप सोपं आणि सरळ बनतं, विशेषतः वैयक्तिक बाबतीत.
कुटुंब आणि मित्रांचं निखळ प्रेम मिळविण्यासाठी सात अंकाचा प्रभाव असलेल्या व्यक्तीला सहाचा प्रभाव असलेल्या व्यक्तीचा पाठिंबा गरजेचा आहे.
भागीदारांपैकी एकाकडे सहा क्रमांकांची ताकद असणं गरजेचं आहे. क्रमांक सातला नेहमी विरुद्ध लिंगाच्या व्यक्तींकडून फायदा मिळतो.
विरुद्धलिंगी व्यक्तीचा मास्टर क्रमांक सहा असेल तर ते यशाची उंची गाठू शकतात. त्याचप्रमाणे ज्या जोडप्यांच्या जन्मतारखेत सात अंक आहे, त्यांच्यातली निष्ठा टिकवून ठेवण्यासाठी किमान एका सहाची गरज असते.
सात आणि सहामधल्या मैत्रीपूर्ण संबंधापेक्षा दोघांना एकमेकांची जास्त गरज असल्याचं दिसतं. शुभ रंग : Teal शुभ दिवस : सोमवार आणि शुक्रवार शुभ अंक : 6 दान : घरकाम करणाऱ्या मदतनीसाला किंवा आश्रमात धातूची भांडी दान करा.