मिथुन - मिथुन राशीच्या लोकांना ऑगस्ट महिना चांगला जाणार आहे. या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात मोठे यश मिळू शकते. करिअरमध्ये मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिक स्थितीही चांगली राहील. तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकता.
ऑगस्टमध्ये मिथुन राशीच्या लोकांचे आरोग्यही चांगले राहील. बदलत्या हवामानामुळे किरकोळ समस्या उद्भवू शकतात. पण, काळजी करण्याची गरज नाही. वैवाहिक जीवन आणि लव्ह लाईफच्या दृष्टीने हा महिना अतिशय छान असणार आहे. तुमचे संबंध मजबूत होतील. यासोबतच तुम्ही लग्न करण्याचाही विचार करू शकता.
सिंह - ऑगस्ट महिन्यात आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. तथापि, वेळोवेळी काही समस्या येऊ शकतात. त्यामुळे संयम न गमावता अडचणी शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा.
सिंह राशीच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना ऑगस्ट महिन्यात यश मिळू शकते. आरोग्यही चांगले राहील. तुम्ही तुमचे आयुष्य मुक्तपणे जगू शकता.
धनु -ऑगस्ट महिन्यात या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नशिबाने साथ असल्यानं प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. नोकरदारांना मेहनतीचे फळ मिळेल. पदोन्नती आणि वेतनवाढ होऊ शकते. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. तुम्ही कुठेतरी प्रवासाची योजना देखील बनवू शकता.
धनु - प्रेम आणि वैवाहिक जीवनाबद्दल तुमचा तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल. तुम्ही कुठेतरी प्रवासाची योजना देखील बनवू शकता. शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला चांगले निकाल मिळू शकतात, जे तुमच्या करिअरला पंख देऊ शकतात.