NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / सोमवारी उपवास करण्याऱ्यांनी या चुका टाळा; महादेवाची कृपा नव्हे होईल अवकृपा

सोमवारी उपवास करण्याऱ्यांनी या चुका टाळा; महादेवाची कृपा नव्हे होईल अवकृपा

हिंदू धर्मात भगवान शिवाचे असंख्य भक्त आहेत, जे सोमवारी उपवास करतात. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा सोमवारी करण्याची प्रथा आहे. सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे. तसं, बघायला गेलं तर एक कळश पाणी अर्पण करूनही भगवान शिव प्रसन्न होतात. सोमवारी महादेवाच्या पूजेदरम्यान भगवान शंकराला अनेक वस्तू अर्पण केल्या जातात. परंतु अशा अनेक गोष्टी आहेत ज्या चुकूनही सोमवारच्या उपवासात करू नयेत. यामुळे भोलेनाथ तुमच्यावर क्रोधित होऊ शकतात. सोमवारी उपवास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा या विषयावर अधिक माहिती देत आहेत.

15

सोमवारचे व्रत असे करावे - धार्मिक श्रद्धेनुसार सोमवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. शिवलिंगाचा जलाभिषेक आपल्या घरी किंवा जवळच्या शिवमंदिरात करावा. या दरम्यान भगवान शिव आणि माता पार्वतीची मंत्रोच्चार करून यथायोग्य पूजा करा आणि व्रत कथा ऐका. सोमवारच्या उपवासात एकाच वेळी अन्न घेणे योग्य मानले जाते. पण काही वेळाने तुम्ही फळे घेऊ शकता.

25

भोलेनाथाच्या पूजेत या चुका करू नका - सोमवारी भगवान शिवाची पूजा करताना दुधाचा अभिषेक करण्यासाठी तांब्याचे भांडे वापरू नका. तांब्याच्या भांड्यात दूध टाकल्याने दुधाचा बाधित होतं. ज्यामुळे त्या भांड्यातून दूध देवाला अर्पण करण्यास योग्य राहत नाही.

35

भगवान शंकराची पूजा करताना पंचामृताने स्नान करून शिवलिंगावर जल अर्पण करावे. शेवटी शिवलिंगावर जल अर्पण केल्यावरच तुम्ही केलेला जलाभिषेक पूर्ण मानला जाईल.

45

भगवान शंकराची पूजा करताना चुकूनही त्यांना रोळी किंवा कुंकवाचा टिळा लावू नका. भोलेनाथांना टिळा लावण्यासाठी चंदनाचा वापर करणे उत्तम मानले जाते.

55

पूजेनंतर कधीही शिवलिंगाची पूर्ण प्रदक्षिणा करू नये. जिथे दूध वाहते तिथे थांबा आणि परत या. ज्या लोकांनी भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारचा उपवास केला आहे, त्यांनी हे लक्षात ठेवावे.

  • FIRST PUBLISHED :