आपल्या राशीसाठी एखादा दिवस, महिना किंवा वर्ष कसं असणार आहे, हे जाणून घ्यायला अनेकांना आवडतं. आता ऑगस्ट 2023 लवकरच सुरू होत असून हा महिना मीन राशींच्या मंडळीसाठी कसा असणार आहे? कोणते शुभ योग, आनंदाचे प्रसंग आणि कोणती आव्हाने घेऊन हा महिना येणार आहे? तसेच यावर ज्योतिषशास्त्रात काय उपाय सांगितले आहेत, हेच आपण वर्धा येथील पं. सतीश शर्मा यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
ऑगस्टमध्ये मीन राशीच्या लोकांसाठी व्यवसायामध्ये प्रगतीचे किंवा भरभराटीचे योग आहेत. तसेच मीन राशीच्या नोकरदार मंडळींसाठी बढतीचे योग देखील संभावत आहेत. प्रकृती सुधारेल आणि स्थावर व्यवहारांमध्ये देखील यश मिळेल. मीन राशीच्या मंडळींना ऑगस्ट महिना हा काहीसा आनंददायी तर काहीसा समस्यामय असू शकतो, असं पंडित सतीश शर्मा सांगतात.
ऑगस्ट महिन्यात मीन राशीच्या मंडळींना काहीसा काळ अडचणींचा आणि समस्यांचा असणार आहे. या अडचणींवर उपाय म्हणून शनि महाराजांना प्रसन्न करणे महत्त्वाचे असेल. त्यासाठी शनि स्त्रोताचे पठण करावे. महादेवाचे दर्शन घ्यावे आणि शनी महाराजांचे पूजा करण्याचा सल्ला पंडित सतीश शर्मा यांनी दिला आहे.
मीन राशीच्या लोकांना ऑगस्ट महिना संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. काही आनंदाचे क्षण येतील. तर काही समस्याही निर्माण होऊ शकतात. मात्र, त्यावर शनि महाराजांना प्रसन्न करून घेतल्यास या अडचणी संपतील. त्यासाठी शनी पूजा, शनी उपासना आणि शनी स्त्रोत्र पठण करावे लागेल, असे शर्मा सांगतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)