NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / Rashichakra: केतू ठरणार डोकेदुखी, तुम्हाला अडचणीत आणेल; या 5 राशींनी जपून राहावं

Rashichakra: केतू ठरणार डोकेदुखी, तुम्हाला अडचणीत आणेल; या 5 राशींनी जपून राहावं

छाया ग्रह किंवा अशुभ ग्रह मानल्या जाणाऱ्या केतूचे संक्रमण सोमवार, 26 जून रोजी सायंकाळी 06.13 वाजता चित्रा नक्षत्रात झाले. केतूने चित्रा नक्षत्रात प्रवेश केल्यानं 5 राशीच्या लोकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण या काळात त्यांचे आरोग्य, उत्पन्न, प्रगती आणि नातेसंबंधांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

16

ज्योतिषशास्त्रात, राहू आणि केतू हे अशुभ ग्रह मानले जातात. कारण त्यांची निर्मिती एका राक्षसाने केली होती, ज्याने कपटाने अमृत घेतले होते. तेव्हा श्री हरी विष्णूंनी त्याचे मस्तक शरीरापासून वेगळे केले. अमृताच्या प्रभावामुळे त्याचे डोके व धड जिवंत राहिले. त्याच्या शरीराच्या या दोन्ही भागांना राहू आणि केतू म्हणतात. 7 ग्रहांनंतर हे दोन ग्रह एकत्र येऊन नवग्रह तयार झाले. कधी कधी राहू आणि केतू शुभ फळही देतात तर कधी अशुभ परिणामही दाखवतात. श्री कल्लाजी वैदिक विद्यापीठाच्या ज्योतिष विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय तिवारी यांनी चित्रा नक्षत्रात केतूचे संक्रमण होत असताना कोणत्या 5 राशीच्या लोकांना काळजी घ्यावी, याविषयी सांगितले आहे.

26

चित्रा नक्षत्रात केतू संक्रमण 2023 नकारात्मक प्रभाव - मिथुन: चित्रा नक्षत्रात केतूच्या संक्रमणामुळे तुमच्या राशीच्या लोकांना शिक्षण आणि स्पर्धेमध्ये अडचणी येऊ शकतात. मन एकाग्र होणार नाही आणि यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. प्रेमप्रकरणात गैरसमज निर्माण होऊ शकतात. यामुळे तुमचे प्रेम जीवन खराब होऊ शकते. जोडीदाराशी वादविवाद टाळा, बोलण्यावर व वागण्यावर संयम ठेवा.

36

कर्क : चित्रा नक्षत्रात केतूच्या आगमनामुळे कर्क राशीच्या लोकांना काळजी घ्यावी लागेल. या काळात घरात कलहाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. दुर्बल शुक्र असलेला केतू नकारात्मक प्रभाव दाखवू शकतो. या ग्रहाच्या संक्रमणामुळे तुमच्या आईच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा त्या आजारी पडू शकतात.

46

कन्या : तुमच्या राशीच्या लोकांना आपल्या बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. कारण तुमच्या कडवट बोलण्याचा नातेसंबंधांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध बिघडू शकतात. केतूमुळे काही काळ प्रियजनांपासून विभक्त होण्याची स्थितीही येऊ शकते. केतू तुमच्या उत्पन्नावरही परिणाम करू शकतो, कमी उत्पन्नामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. या काळात जर तुम्ही हुशारीने गुंतवणूक केली तर भविष्यात ते फायदेशीर ठरू शकते.

56

मकर : व्यवसायात गुंतलेल्यांना चित्रा नक्षत्रात केतूची उपस्थिती सावध राहण्याचा सल्ला देत आहे. या काळात नफ्यात घट होऊ शकते. नवीन योजना यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. एवढेच नाही तर व्यवसायाचा विस्तार करताना तुम्हाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. यामुळे तुम्ही तणावाखाली येऊ शकता. कायदे आणि नियम लक्षात घेऊन काम करा, अन्यथा अडचण निर्माण होऊ शकते.

66

मीन: चित्रा नक्षत्रात केतूच्या आगमनामुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. सध्या खूप जपून गाडी चालवावी लागेल. आगीमुळे वित्तहानी होण्याचीही शक्यता आहे. जुना आजार तुम्हाला पुन्हा त्रास देऊ शकतो. गोपनीयतेने गोष्टी करा. लोकांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका.

  • FIRST PUBLISHED :