यंदाची ज्येष्ठ अमावस्या आजपासून सुरू होत असून रविवार, 18 जून पर्यंत आहे. या दिवशी सकाळी पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते. अमावस्या हा दिवस पितरांच्या शांतीसाठी अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो. ज्येष्ठ अमावस्येला पितरांच्या शांतीसाठी खालील पैकी एक उपाय केल्यासही पितृदोषापासून मुक्ती मिळते.
ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी यापैकी एक गोष्ट करा - तर्पण- ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्या तिथीला सकाळी लवकर उठून पवित्र नदीत स्नान करावे. पितरांसाठी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. यानंतर नदीच्या काठावर पिंडदान किंवा पितरांचे तर्पण करावे. या दिवशी घरी खीर-पुरी बनवून वर गूळ आणि तूप टाकून नैवेद्य अर्पण केल्याने पूर्वज प्रसन्न होतात.
व्रत ठेवा- ज्योतिषांच्या मते, पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तुम्ही या दिवशी व्रत-उपवास इत्यादी करू शकता. या दिवशी उपवास करून 'पितृसुक्ता'चे पठण करावे. दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा आणि ब्राह्मणाला भोजन द्यावे. या दिवशी कावळ्यांना अन्न-पाणी अर्पण करण्याबरोबरच गायी आणि कुत्र्यांनाही चारा द्यावा.
पितरांसाठी दान करा- ज्योतिष शास्त्रानुसार पितरांचे आशीर्वाद मिळण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी गरीबांना, ब्राह्मणाला दक्षिणा दान करा. या दिवशी पितरांच्या शांतीसाठी हवन करून दान करावे. जर तुम्ही हे करू शकत नसाल तर या दिवशी गरीब आणि गरजूंना भोजन द्यावे.
दिवा लावा - आषाढ अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावणं शुभ मानलं जातं. तसेच पितरांचे स्मरण करून पिंपळाच्या झाडाची 7 वेळा प्रदक्षिणा करावी.
शंभू महादेवाची आराधना करा- पूर्वजांच्या आशीर्वादाने वंशजांच्या प्रगतीचा मार्ग अधिक खुला होतो, असे शास्त्रात सांगितले आहे. पितरांसाठी अमावस्येला भगवान भोलेनाथाची पूजा करून शनिदेवाची पूजा केल्याने पितर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)