ब्रोमो पर्वतावर एक सक्रिय ज्वालामुखी आहे. दरवर्षी हजारो लोक ब्रह्मा आणि गणेशाची पूजा करण्यासाठी येथे येतात. येथे सक्रिय ज्वालामुखीमध्ये ब्रह्मदेवाचे वास्तव्य आहे, असे येथील हिंदू मानतात.
अल्जझीराच्या माहितीनुसार, येथे शतकानुशतके जुन्या धार्मिक समारंभात हजारो हिंदू उपासक प्राणी, अन्नपदार्थ आणि इतर काही गोष्टी सक्रिय ज्वालामुखीमध्ये अर्पण करतात. सोमवारच्या दिवशी माउंट ब्रोमोच्या खोऱ्याभोवतीच्या कड्याला प्रदक्षिणा घालत, यज्ञ कसदा उत्सवाचा एक भाग म्हणून भाविक त्यांच्या पाठीवर शेळ्या, कोंबड्या आणि भाज्या घेऊन ज्वालामुखीच्या धुळीच्या शिखरावर जातात.
इंडोनेशियामध्ये सध्या 130 सक्रिय ज्वालामुखी आहेत. ब्रोमा पर्वत 7 हजार फूट उंच आहे. एवढी उंची असूनही लोकांची श्रद्धा एवढी प्रचंड आहे की, हजारो लोक इथे येतात. कोरोनाच्या काळात इथे लोकांना जाण्याची परवानगी नव्हती. मात्र, सोमवारी हजारो लोक येथे पोहोचले.
दरवर्षी आसपासच्या डोंगराळ प्रदेशातील टेंगर जमातीचे लोक ज्वालामुखीच्या शिखरावर देवतांना संतुष्ट करण्याच्या आणि पूर्व जावामधील टेंग्रीस या स्थानिक जमातीतील लोक नशीब चमकण्याच्या आशेने जमतात. 40 वर्षीय शेतकरी स्लेमेटने गायीचे वासरू अर्पण करण्यासाठी आणले होते.
स्लेमेट म्हणाला, 'आमच्या घरात भरपूर गायी-गुरे आहेत आणि हे वासरू जास्त होत आहे. म्हणून आम्ही त्याला इथे आणत आहोत... त्याला देवाला परत करण्यासाठी. देवाने आम्हाला समृद्धी दिली त्याबद्दल ही कृतज्ञता आहे. पुढच्या वर्षी इथे परत यावे म्हणून आम्ही त्याला देवाकडे परत करतो. प्रार्थनेनंतर त्याला गावकऱ्याकडे सुपूर्द करण्यात आले.
टेंगर जमातीचे काही लोक अन्न आणि इतर गोष्टींची नासाडी टाळण्यासाठी खड्ड्यावर जाळे लावतात. जोको प्रियंतो नावाचा एक शेतकरी, आपल्या शेतातील कोबी आणि गाजरे घेऊन ज्वालामुखीत टाकण्यासाठी घेऊन आला होता.
COVID-19 साथीच्या रोगानंतर प्रथमच सोमवारी अधिकाऱ्यांनी पर्यटकांना साइटला भेट देण्याची परवानगी दिली. हा सण गेल्या वर्षी पूजकांपुरताच मर्यादित होता, त्याची मुळे आग्नेय आशियामध्ये पसरलेल्या जावानीज हिंदू-बौद्ध राज्य, मजपाहित राज्याच्या १५व्या शतकातील लोककथांमध्ये असल्याचे सांगितले जाते.