NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / या चुकीच्या सवयींमुळे कुंडलीत सूर्याची ग्रहस्थिती होते कमकुवत; अडचणी वाढण्याचं कारण

या चुकीच्या सवयींमुळे कुंडलीत सूर्याची ग्रहस्थिती होते कमकुवत; अडचणी वाढण्याचं कारण

एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत स्थितीत असल्यास यश आणि कीर्ती साध्य करणे सहज शक्य होते. सूर्याच्या तेजामुळं ती व्यक्ती जिथंही असते तिथं नेतृत्वाच्या किंवा मुख्य भूमिकेत राहते, असे मानले जाते. परंतु, आपल्या काही वाईट सवयींमुळे कुंडलीतील सूर्य देव कमजोर होतो, ज्यामुळे जीवनात अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं.

17

आज आम्ही त्याबद्दल सांगणार आहोत, जेणेकरून आपण थोडं सावध राहावं. जाणून घेऊया अशा काही चुकीच्या सवयींबद्दल ज्यामुळे सूर्यदेव नाराज होतात. कुंडलीतील सूर्याची ग्रहस्थिती कमकुवत होते.

27

तुमच्या स्वतःच्या वडिलांशी तुमची खूप भांडणे आणि वाद होत असल्यास कुंडलीतील सूर्य कमजोर होतो. तुम्ही त्यांचा वारंवार अपमान करू लागलात तर तुमच्या या सवयीमुळे सूर्यदेव रागावतात.

37

सकाळी सूर्योदयानंतर उठल्यानं तुमच्या कुंडलीतील सूर्य कमजोर होतो. म्हणूनच सकाळी लवकर उठून सूर्यनमस्कार करा. यामुळे सूर्यग्रह मजबूत स्थितीत राहतो.

47

काही लोक आपल्या कामाची अधिक प्रशंसा करतात. किंवा आपण करतोय तेच योग्य आहे, असे म्हणत राहतात. स्वतःची स्तुती करत राहतात, ज्यामुळे सूर्यदेव क्रोधित होतात. म्हणूनच आपल्याला ही सवय सुधारण्याची गरज आहे.

57

सूर्याला कसं प्रसन्न करावं - सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी सकाळी लवकर उठून त्याला अर्घ्य अर्पण करावे. तसेच सूर्य मंत्राचा जप करा-

67

ॐ हृां मित्राय नम:, ॐ हृीं रवये नम:, ॐ हूं सूर्याय नम:, ॐ ह्रां भानवे नम:, ॐ हृों खगाय नम:, ॐ हृ: पूषणे नम:,

77

ॐ ह्रां हिरण्यगर्भाय नमः, ॐ मरीचये नम:, ॐ आदित्याय नमः, ॐ सवित्रे नमः, ॐ भास्कराय नमः, ॐ अर्काय नमः (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

  • FIRST PUBLISHED :