NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / होलाष्टकातही करू शकाल खरेदी; दागिने-वाहने खरेदीसाठी हे आहेत शुभ मुहूर्त

होलाष्टकातही करू शकाल खरेदी; दागिने-वाहने खरेदीसाठी हे आहेत शुभ मुहूर्त

होलाष्टकादरम्यान सर्व प्रकारच्या खरेदीसाठी हे सात दिवस शुभ ठरणार आहेत.

16

27 फेब्रुवारीपासून होलाष्टक सुरू झाले आहे. जे 7 मार्चपर्यंत कायम राहील. होळीपूर्वी या दिवसांत शुभ कार्ये केली जात नाहीत. पण या दिवसांत खरेदी करण्यात दोष नसल्याचं जाणकार सांगतात. ज्योतिषशास्त्रीय ग्रंथानुसार खरेदी वर्षभर करता येते. ज्यासाठी काही तारखा, वेळा, नक्षत्र आणि शुभ योग निश्चित केले आहेत. या योगांमुळे होलाष्टकादरम्यान सर्व प्रकारच्या खरेदीसाठी हे सात दिवस शुभ ठरणार आहेत.

26

दोन दिवस पुष्य नक्षत्राचा योगायोग या दिवसांमध्ये शुक्रवार आणि शनिवारी पुष्य नक्षत्र असेल. यामुळे शुक्र आणि शनि पुष्याचा संयोग होईल. हे शुभ नक्षत्र शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत राहील. अशा प्रकारे पुष्य नक्षत्रात खरेदीसाठी दोन दिवस शुभ ठरणार आहेत. या नक्षत्रात केलेली खरेदी दीर्घकाळ लाभदायक ठरते. त्यामुळे सुख-समृद्धी वाढते.

36

5 आणि 9 मार्च वगळता दररोज शुभ मुहूर्त ज्योतिषांच्या मते, या वेळी होलाष्टक 9 दिवस राहील. ज्यामध्ये रविवार, 5 मार्च आणि मंगळवारी 7 मार्चला शुभ मुहूर्त नाही. या आठवड्यात तीन सर्वार्थसिद्धी आणि पाच रवियोग आहेत. यासोबतच दोन दिवस पुष्य नक्षत्राचा योगायोग असेल. या दिवसांमध्ये वाहन खरेदीसाठी 4 विशेष शुभ मुहूर्त आणि मालमत्तेसाठी दोन शुभ दिवस असतील. शुभ योगांमध्ये केलेली गुंतवणूक, व्यवहार आणि खरेदी लाभदायक ठरेल.

46

होळाष्टकात खरेदीचे शुभ मुहूर्त 27 फेब्रुवारी - सर्वार्थसिद्धी योग व वाहन खरेदीचा शुभ मुहूर्त 28 फेब्रुवारी -रवियोग 1 मार्च - रवियोग व वाहन खरेदीसाठी शुभ मुहूर्त

56

2 मार्च - सर्वार्थसिद्धी, रवियोग, वाहन व मालमत्ता खरेदीचा शुभ मुहूर्त 3 मार्च - सर्वार्थसिद्धी योग, वाहन व मालमत्ता खरेदीचा शुभ मुहूर्त 4 मार्च - शनिवार रवियोग आणि पुष्य नक्षत्र 6 मार्च - सोमवार, रवियोग

66

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

  • FIRST PUBLISHED :