हनुमान जयंती संपूर्ण देशात अत्यंत उत्साहानं साजरी केली जाते. पण जालना जिल्ह्यातील गाव मात्र त्याला अपवाद आहे.
जालना शहरापासून 55 किलो मीटर अंतरावर असलेल्या जामखेड गावातील लोक हनुमानाची नव्हे तर जांबुवंताची आराधना करतात.
त्यामुळे इतरत्र मोठ्या उत्साहात साजरी होणारी हनुमान जयंती जामखेड परिसरातील 13 गावं साजरी करत नाहीत.
माळवाडी, भोकरवाडी, ठाकरवाडी, नागोण्याची वाडी, लिंबेवाडी, जोगेश्वरवाडी, नारळाचीवाडी, कोंबडवाडी, विठ्ठलवाडी, पागेरवाडी, ठोकळ्याचीवाडी, बक्ष्याची वाडी आणि जामखेड या 13 गावांत हनुमान जयंती साजरी होत नाही
या गावांमध्ये हनुमान जयंतीऐवजी जांबुवंतांची पूजा होते. 'जांबुवंत महाराज की जय' असा उद्घोष देखील केला जातो.
या गावातील ग्रामस्थ हनुमान नव्हे तर प्रभू रामचंद्रांचे मार्गदर्शक जांबुवंत यांचे निस्सीम भक्त आहेत. यामुळे गावात हनुमानाचे मंदिर, मूर्ती किंवा फोटो नाही. घराघरात जांबुवंतांचीच पूजा होते
. पुरातन काळात हा भाग दंडकारण्यात मोडत होता. येथे रामायणासोबत महाभारताशी संबंधित आख्यायिका प्रचलित आहेत. येथेच जांबुवंतांचे राज्यातील एकमेव मंदिर आहे.
जांबुवंतांचा येथेच एका गुहेत निवास असल्याची या भागातील भाविकांची श्रद्धा आहे. . जांबुवंतावरून परिसराचे नाव जामखेड पडले, असे मानले जाते.