जुना पुणे मुंबई महामार्गावरील प्राचीन पांडवकालीन घोरावडेश्वर मंदिरात शिवलिंगावर फळांचा वापर करून हनुमान रूप साकारण्यात आलं आहे. (गणेश दुडम, प्रतिनिधी)
हनुमान जन्मोत्सव असल्याने शिवलिंगावर हे रूप साकारण्यात आले आहे.
शिवलिंगावर मुकुट म्हणून 51 डाळिंबाच्या बियांचा वापर करण्यात आला आहे. चंदन कणकेचा वापर करून हनुमानाचा चेहरा साकारण्यात आला आहे.
तर संपूर्ण मंदिरात एक हजार एक पिंपळाच्या पानावर राम लिहीत संपूर्ण पाने मंदिरात ठेवण्यात आली आहेत.
ही संपूर्ण सजावट घोरवाडेश्वर प्रतिष्ठानच्या हनुमान भक्तांनी तब्बल 3 तासात केली आहे. त्यामुळे घोरवडेश्वरच्या या पांडवकालीन मंदिरात राम नामाचा जप पहायला मिळाला.
पैलवान तालमीतील मातीत देखील आज हनुमान जयंती निमित्त मारुतीची प्रतिमा साकारण्यात आली.
ही सजावट पाहण्यासाठी हनुमान भक्तांनी आज गर्दी केली होती.