NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / हनुमान जयंतीला आपल्या राशीनुसार या मंत्रांचा करा जप; बजरंगबलीची राहील कृपा

हनुमान जयंतीला आपल्या राशीनुसार या मंत्रांचा करा जप; बजरंगबलीची राहील कृपा

hanuman jayanti 2023 puja mantra: गुरुवार, 06 एप्रिल रोजी हनुमान जयंती आहे. या दिवशी बजरंगबलीची पूजा विधी-परंपरेनुसार केली जाते, उपवास केला जातो. रुद्रावतार हनुमानाचा जन्म चैत्र पौर्णिमेला मंगळवारी झाल्याचे मानले जाते. म्हणूनच दरवर्षी चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. हनुमान जयंतीला बजरंगबलीची कृपा राहण्यासाठी अनेक प्रकारचे ज्योतिषीय उपायही केले जातात, यावेळी तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार प्रभावी हनुमान मंत्राचा जप करून तुमची इच्छा पूर्ण करू शकता. हनुमान संकट दूर करतात आणि तुमचे जीवन यश आणि समृद्धीने भरतील. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ.कृष्णकुमार भार्गव यांनी राशीनुसार हनुमानाचे प्रभावी मंत्र सांगितले आहेत.

18

हनुमानाचे शक्तिशाली मंत्र - मेष आणि वृश्चिक: या राशीच्या लोकांसाठी प्रभावी मंत्र म्हणजे "ओम अं अंगारकाय नमः" कारण तुमच्या राशीचा अधिपती ग्रह मंगळ आहे.

28

वृषभ आणि तूळ: या राशीसाठी प्रभावी हनुमान मंत्र "ओम हं हनुमते नम:" हा आहे. कारण तुमच्या राशीचा प्रमुख ग्रह शुक्र आहे.

38

मिथुन आणि कन्या: या दोन्ही राशींचा स्वामी बुध ग्रह आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी आपण अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं दनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यम्। सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि॥ मंत्राचा जप करावा.

48

कर्क: तुमच्या राशीचा स्वामी चंद्र आहे. तुमच्यासाठी हनुमानाचा प्रभावी मंत्र "ओम अंजनिसुताय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो मारुति प्रचोदयात्" हा आहे

58

सिंह: या राशीच्या लोकांनी "ओम हं हनुमते रुद्रात्मकाय हुं फट" या मंत्राचा जप करू शकता. या राशीचा अधिपती ग्रह सूर्य आहे.

68

धनु आणि मीन: हनुमान जयंतीला तुम्ही "ओम हं हनुमते नमः" मंत्राचा जप करू शकता. या दोन्ही राशींचा शासक ग्रह गुरु आहे.

78

मकर आणि कुंभ: या दोन्ही शनीच्या राशी आहेत. तुम्ही "ओम नमो हनुमते रूद्रावताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोग हराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा" या मंत्राचा जप करू शकता.

88

विशिष्ट कार्यातील यश मिळवण्यासाठी - जर तुम्हाला कोणत्याही कठीण किंवा विशेष कामात यश मिळवायचे असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी पूजेच्या वेळी बजरंग बाणचा पाठ करा. बजरंग बाणचा किमान 5 किंवा 21 वेळा पाठ करा. बजरंग बाणाच्या प्रभावाने तुमचे कार्य यशस्वी होऊ शकते. हनुमानाच्या कृपेने तुम्ही संकटांपासून सुरक्षित राहाल. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

  • FIRST PUBLISHED :