NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / या 5 प्रभावी मंत्रांचा जप करून पडा घराबाहेर, अवघड वाटणारी कामंही लिलया पार पाडू शकाल

या 5 प्रभावी मंत्रांचा जप करून पडा घराबाहेर, अवघड वाटणारी कामंही लिलया पार पाडू शकाल

Lord Ganesha Mantras: हिंदू धर्मात कोणत्याही शुभ किंवा मंगल कार्यापूर्वी श्रीगणेशाची पूजा केली जाते. असे मानले जाते की, सर्वप्रथम श्रीगणेशाची पूजा केल्याने प्रत्येक शुभ कार्यात यश मिळते. श्रीगणेशाची पूजा करताना या 5 मंत्रांचा जप करणे खूप फायदेशीर मानले जाते. मंत्र आणि त्याच्या अर्थांविषयी भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून जाणून घेऊया.

15

गणपतीचा हा मंत्र सर्वाधिक लोकप्रिय आहे. म्हणजे ज्याची सोंड वक्र आहे, ज्याचे शरीर विशाल आहे, ज्याचे तेज करोडो सूर्यासारखे आहे, अशा देवता माझी सर्व कार्ये कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होऊ द्या.

25

या मंत्रात गणेशाची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. श्रीगणेश जसा विघ्न दूर करणारा, वरदान देणारा, सर्व देवी-देवतांचा प्रिय, लंबोदर असलेला, सर्व कलांचा जाणकार, या जगाचा कल्याण करणारा, ज्याचे मुख गजासारखे आहे, जो सर्व वेद जाणतो आणि यज्ञांनी युक्त आहे. हे पार्वतीचे पुत्र गणनाथ, आम्ही तुला नमन करतो, असा अर्थ आहे.

35

हे गणेशा, तुमची ख्याती कोणत्याही प्रकारे मोजणे अशक्य आहे. तू प्राणीमात्रांना आपलासा आहेस, उंदीर तुझे वाहन आहेस, तू सर्व जगाचा अधिपती आहेस, आम्ही तुला वारंवार नमन करतो.

45

या मंत्रात नमूद केलं आहे की, ज्याला एक दात (एकदंताय) आहे, सुंदर चेहरा आहे, जो त्याचा आश्रय घेणाऱ्या भक्तांचे रक्षण करतो, जो सर्व प्राणिमात्रांचे दुःख हरण करतो, त्याला आम्ही नमन करतो.

55

गणपतीचा हा मंत्र खूप लोकप्रिय आहे. या मंत्राचा अर्थ असा आहे की, आपण एकदंत देवतेला नमस्कार करतो. अशा वक्रतुंड देवाचे आपण ध्यान करतो, श्रीगणेश आशीर्वाद देवो. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

  • FIRST PUBLISHED :