मिथुन: वर्ष 2023 चे पहिले चंद्रग्रहण मिथुन राशीच्या लोकांचे भाग्य उजळवू शकते. जे नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना यश मिळेल. नोकरदारांना पदोन्नती आणि पगारवाढीचा लाभ मिळू शकतो. यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसायाशी संबंधित लोकांना व्यवसायात नफा कमावण्याची संधी मिळेल.
भाग्य मिथुन राशीच्या लोकांवर कृपा करेल. तुम्हाला परदेश प्रवासाची संधी मिळू शकते, जी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकेल. याशिवाय शैक्षणिक स्पर्धेशी निगडीत असलेल्यांसाठी काळ अनुकूल आहे, त्यांना यश मिळू शकतं.
सिंह: चंद्रग्रहण या राशीच्या लोकांसाठीही सकारात्मक परिणाम देऊ शकते. जर तुम्हाला नवीन प्रकल्प सुरू करायचा असेल तर तुम्हाला त्यात यश मिळेल. या काळात मन उपासना आणि अध्यात्मात व्यग्र राहील. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल.
मालमत्तेबाबत किंवा इतर कोणत्याही बाबतीत कोर्टात खटला सुरू असेल तर तुम्हाला दिलासा मिळू शकेल. कदाचित निर्णय तुमच्या बाजूने असेल. मात्र, वादविवादापासून दूर राहा. जे सरकारी नोकरी किंवा इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांनी अधिक मेहनत करावी. तुम्हाला यश मिळू शकते.
नोकरदार लोकांचे पद आणि प्रतिष्ठा वाढू शकते. करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल.