धावपळीच्या आयुष्यात आपण काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. नंतर त्यामुळे संकटे उभी राहतात. अशावेळी चाणक्य नीति आपल्याला मदत करू शकते.
आचार्य चाणक्य यांच्या मते दुर्बल माणसाबरोबर कधीच मैत्री करू नये. चाणक्य सांगतात कमजोर मनाच्या माणसांबरोबर मैत्री घातक ठरते. मैत्री करताना भावनेच्याभरात मैत्री करून नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते.
बर्याचदा असं होतं की, एखादी व्यक्ती कोणत्यातरी कारणामुळे स्वतःहून दुर्बल व्यक्तींबरोबर संबंध जोडतात. त्यांना असं वाटतं की, दुर्बल व्यक्तीला आपण नियंत्रणात ठेवू शकतो. पण, दुर्बल माणसं नेहमीच संधिसाधू असतात. वेळ बदलल्यानंतर आपली साथ सोडू शकतात.
जेव्हा पण त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेस मैत्री तोडून दुसऱ्या व्यक्तीशी मैत्री करतात. अडचणीच्या परिस्थितीत दुर्बल लोक मैत्री विसरून जातात आणि कोणत्याही व्यक्तीला धोका देऊ शकतात.
हा धोका इतका भयंकर असू शकतो की तुम्ही अडचणीत सापडू शकता. त्यामुळे कधीही कमजोर दुर्बल व्यक्तीबरोबर मैत्री करू नये. (सूचना: येथे दिलेली माहिती चाणक्यांच्या नीतीशास्त्रावर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)