कन्या - बुध आणि शुक्राच्या संयोगामुळे या राशीच्या लोकांनी थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. कोणतेही नवीन काम करणे टाळा, कारण त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. सर्व काही तुम्ही नियोजित केल्याप्रमाणे चालेल असे नाही. अशा परिस्थितीत धनहानी देखील होऊ शकते. व्यापाऱ्यांनीही थोडे सावध राहावे.
कन्या राशीच्या लोकांनी या काळात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक टाळा, यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. नोकरदारांनीही थोडे सावध राहिले तर बरे होईल. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार केला पाहिजे, कारण त्याचा आर्थिक परिस्थितीसोबतच जीवनावरही परिणाम होऊ शकतो.
धनु - शुक्र आणि बुध यांच्या संयोगामुळे या राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता जाणवेल. कामाच्या ठिकाणी त्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. नशीबही तुम्हाला साथ देणार नाही. म्हणूनच कोणतेही काम थोडे विचार करून करा.
धनु - वैवाहिक जीवनातही काही समस्या निर्माण होऊ शकतात. दुसऱ्या बाजूला आपण आपले ध्येयही साध्य करू शकता. तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्याला मागे टाकू शकता.
मकर - शुक्र आणि बुध यांच्या संयोगामुळे या राशीच्या लोकांची कामे वेळेवर होणार नाहीत. आर्थिक आणि मानसिक समस्यांना त्यामुळे सामोरे जावे लागू शकते. नोकरदार लोकांनी मनापासून काम करा, कारण त्याचा तुमच्या बढती आणि पगारवाढीवर परिणाम होऊ शकतो.
मकर राशीच्या लोकांची आर्थिक स्थितीतही चढ-उतार असतील. करिअरमध्ये काही कठीण निर्णय घ्यावे लागतील. कुटुंबात काही मतभेद होऊ शकतात.