मेष : बुध गोचरामुळे तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. या काळात योग्य निर्णय घेण्यासाठी तुम्हाला बराच वेळ लागू शकतो किंवा कोंडीत अडकू शकता. व्यापारी वर्गाला लाभासाठी खूप मेहनत करावी लागेल. करिअरच्या दृष्टीने वेळ आव्हानात्मक असू शकतो.
वृषभ : नोकरदारांना काम करावेसे वाटणार नाही. कामाच्या ठिकाणी मतभेद हे त्याचे प्रमुख कारण असू शकते. नोकरी बदलण्याची इच्छा मनात येऊ शकते. व्यावसायिकांसाठी हा काळ कठीण असेल. पुढे जाण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. भौतिक जीवनातील सुख-सुविधा कमी होऊ शकतात.
मिथुन: बुध गोचरामुळे या राशीच्या लोकांना परदेशात नोकरी मिळू शकते. नोकरदार लोकांना अचानक बढती आणि पगारवाढीचा लाभ मिळू शकतो. या काळात तुम्ही घर, वाहन, प्लॉट किंवा फ्लॅट घेण्याचा विचार करू शकता. मालमत्तेतील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. करिअरमध्ये प्रगतीसाठी काळ अनुकूल आहे.
कर्क : बुध गोचरामुळे आयात-निर्यात किंवा परदेश व्यापारात गुंतलेल्यांना फायदा होऊ शकतो. तुमच्या निष्काळजीपणामुळे नफा कमावण्याची संधी हातातून जाऊ शकते. नोकरदारांवर कामाचा ताण वाढेल. सहकाऱ्यांचे सहकार्य न मिळाल्याने मन अस्वस्थ होऊ शकते. उधळपट्टीवर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा आर्थिक परिस्थिती बिघडू शकते.
सिंह: व्यवसायाशी संबंधित लोकांवर बुध ग्रहाचा आशीर्वाद असेल आणि तुम्हाला नफा मिळविण्याच्या अनेक संधी मिळू शकतात. तुमचे नेटवर्क विस्तारेल, जे भविष्यात फायदेशीर ठरू शकते. करिअरसाठी वेळ चांगला आहे. तुमच्या कामाचे कौतुक होईल. लोक तुमच्यामुळे प्रभावित होतील. या काळात प्रवासाचीही शक्यता आहे, जी तुमच्या करिअरसाठी अनुकूल ठरू शकते.
कन्या : बुधाच्या कृपेने काही लोकांना परदेशात नोकरी किंवा परदेशी कंपनीचे काम मिळू शकते. मात्र, सध्याच्या नोकरीत तुम्हाला आनंद मिळणार नाही, त्यामुळे तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. या काळात तुमचा खर्च वाढेल, त्याचा भार तुमच्या खिशावर पडेल. बचतीवरही परिणाम होऊ शकतो.
तूळ: जे लोक परदेशात नोकरीच्या प्रयत्नात आहेत, त्यांना यश मिळू शकते. व्यवसायाशी संबंधित लोकांना मोठ्या फायद्याची संधी मिळू शकते.
वृश्चिक: तुमच्या राशीच्या लोकांना नोकरीच्या बाबतीत असुरक्षिततेची भावना मनात असू शकते. या काळात कामाचा ताण तुमच्यावर जास्त असू शकतो.
धनु: हा काळ तुमच्या करिअरच्या प्रगतीसाठी जबरदस्त असेल. करिअरमध्ये पुढे जाण्याच्या अनेक संधी मिळतील. परदेशात जाण्याचीही शक्यता आहे.
मकर : बुध गोचरामुळे धनहानी होण्याची शक्यता आहे. घाईगडबडीत कोणतीही गुंतवणूक करू नका. या काळात कोणालाही हातउसने पैसे, कर्ज देऊ नका.
कुंभ: तुमच्या राशीच्या लोकांना कामात मित्र आणि नातेवाईकांची मदत मिळू शकते. मात्र, कामात यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. कामात मन लावले तरी यश मिळण्यात अडचण येईल.
मीन: बुधाच्या संक्रमणामुळे तुमच्या राशीच्या लोकांच्या खर्चात बेहिशेबी वाढ होऊ शकते. नोकरदारांना काम करावेसे वाटणार नाही. या काळात तुमच्यावर कामाचा ताण जास्त असू शकतो.