NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / ईदला प्रियजनांना कोणत्या भेटवस्तू द्याव्यात? आम्ही सांगितलेले 7 पर्याय पसंत पडतील

ईदला प्रियजनांना कोणत्या भेटवस्तू द्याव्यात? आम्ही सांगितलेले 7 पर्याय पसंत पडतील

Best Gift Ideas for Eid 2023 : देशभरात ईदचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यंदा 21 किंवा 22 एप्रिलला ईद-उल-फित्रचा सण साजरा केला जाणार आहे. ईदनिमित्त लोकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. अनेकांनी ईदची खरेदीही सुरू केली आहे. जर तुम्ही तुमच्या प्रियजनांना ईदच्या दिवशी भेटवस्तू देण्याचा विचार करत असाल, तर शॉपिंग लिस्टमध्ये काही गोष्टींचा समावेश करून तुम्ही कमी बजेटमध्ये सर्वोत्तम ईद गिफ्ट देऊ शकता.

17

गिफ्ट परफ्यूम : ईदच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींना परफ्यूम गिफ्ट करू शकता. पाहुण्यांना निरोप देताना परफ्यूम भेट देण्याची प्रथा प्राचीन काळापासून दक्षिण पूर्व आशियामध्ये आहे. या परंपरेनुसार ईदच्या दिवशी घरी आलेल्या पाहुण्यांना निरोप देताना तुम्ही उत्तम सुगंध असलेले परफ्यूम किंवा अत्तर भेट देऊ शकता. (इमेज-कॅनव्हा)

27

दागिने: दागिने बहुतांश महिलांना आवडतात. तुम्ही ईदनिमित्त घरातील महिलांना सुंदर दागिने भेट देऊ शकता. यासाठी तुम्ही अंगठी, कानातले, नोज पिन किंवा ब्रेसलेट खरेदी करू शकता. (इमेज-कॅनव्हा)

37

धार्मिक पुस्तक द्या : ईदनिमित्त पाहुणे-मित्र-नातेवाईकांना पुस्तक भेट म्हणून देणे हाही एक चांगला पर्याय ठरू शकतो. तुम्ही पाहुण्यांसाठी-प्रियजनांसाठी इस्लामिक धर्म आणि संस्कृतीशी संबंधित पुस्तके खरेदी करू शकता. यामुळे इस्लाम धर्माविषयी लोकांमध्ये जागरुकताही वाढेल. (इमेज-कॅनव्हा)

47

फिटनेस ट्रॅकर्स: ईदच्या दिवशी आरोग्याशी संबंधित भेटवस्तू देण्यासाठी तुम्ही फिटनेस ट्रॅकर्स खरेदी करू शकता. फिटनेसचा तपाण्यासाठी अनेक स्मार्ट घड्याळेही बाजारात उपलब्ध आहेत. फिटनेस ट्रॅकरच्या मदतीने लोक त्यांचे रक्तदाब आणि हृदयाचे ठोके यासारख्या गोष्टी सहजपणे तपासू शकतात. (इमेज-कॅनव्हा)

57

ड्रायफ्रूट्स पॅक: ईदच्या दिवशी पाहुण्यांना सुकामेवा (ड्राय फ्रूट्स) भेट देणे हा देखील एक चांगला पर्याय ठरू शकतो. त्याचबरोबर ईदच्या काळात सुका मेवाही सुंदर पॅकिंगसह बाजारात येतो. आपल्या बजेटनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स खरेदी करून घरी आलेल्या पाहुण्यांना भेट देऊ शकता. (इमेज-कॅनव्हा)

67

फोटो फ्रेम गिफ्ट करा: कुटुंब, मित्र आणि जवळच्या व्यक्तींना अविस्मरणीय भेटवस्तू देण्यासाठी तुम्ही बाजारातून सुंदर फोटो फ्रेम खरेदी करू शकता. फोटो फ्रेमसाठी पाहुण्यांसोबतचा तुमचा फोटो टाकून तुम्ही त्यांना ईदचा अप्रतिम नजारा सादर करू शकता. (इमेज-कॅनव्हा)

77

वेगवेगळ्या टोपल्या: ईदच्या दिवशी पाहुण्यांना भेट देण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या टोपल्या देखील निवडू शकता. तुम्ही चॉकलेट, परफ्यूम, मेकअप उत्पादने आणि स्नॅक्स यांसारख्या गोष्टींचा वापर वेगवेगळ्या प्रकारच्या टोपल्या सजवण्यासाठी करू शकता. (इमेज-कॅनव्हा)

  • FIRST PUBLISHED :