बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखलं जातं.
महाशिवरात्रीच्या दिवशी वैद्यनाथ जयंती असते. त्यामुळे मोठ्या संख्येने शिवभक्त येतात.
प्रभू वैद्यनाथाच्या मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त अभिषेक आणि पूजा अर्चा होत आहेत.
महाशिवरात्रीनिमित्त संपूर्ण परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे मंदिर परिसर उजळून निघाला आहे.
फुलांच्या माळांनी मंदिराच्या कळसाला आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे.
महाशिवरात्रीनिमित्त प्रभू वैद्यनाथाच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी असते.
प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी देश आणि विदेशातून भाविक येत असतात.
महाशिवरात्रीनिमित्त मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.