NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / Shani Tips: या राशींवर शनीची असते विशेष कृपा; साडेसाती, महादशेतही शुभ गोष्टी घडून येतात

Shani Tips: या राशींवर शनीची असते विशेष कृपा; साडेसाती, महादशेतही शुभ गोष्टी घडून येतात

Shani dev favourite zodiac sign: ज्योतिषशास्त्रात शनी ग्रहाला क्रूर ग्रह मानले जाते, शनीच्या वक्रदृष्टीला सगळेच घाबरतात. परंतु शनी लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. शनि ग्रहाचा स्वभाव सत्याचे अनुसरण करणे आहे. पृथ्वीतला असलेल्या प्रत्येक मनुष्याच्या चांगल्या-वाईट कर्मांचा हिशोब शनिदेव करत असतो, असे मानले जाते. या कारणास्तव शनिदेवाला कलियुगातील न्यायदंडाधिकारी किंवा न्यायाधीश म्हणूनही ओळखले जाते.

15

बहुतेक लोक शनीची साडेसाती अशुभ मानतात, परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे. काही गोष्टींमध्ये शनिदेव साडेसातीमध्ये देखील शुभ परिणाम देतात. काही राशींवर शनीदेव नेहमी मेहरबान असतात, अशा राशींच्याविषयी ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून जाणून घेऊया.

25

मकर आणि कुंभ राशीचा स्वामी शनी- ज्योतिषशास्त्रानुसार मकर आणि कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे. सध्याच्या वर्तमानाबद्दल बोलायचे झाले तर सध्या शनिदेव मकर राशीत भ्रमण करत आहेत. म्हणजेच यावेळी शनी स्वतःच्या राशीत विराजमान आहे.

35

असे मानले जाते की, शनि जर वक्री अवस्थेत असेल तर तो शुभफळ देत नाही. त्यामुळे मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी याकाळात काळजी घेणे आवश्यक आहे.

45

या दोन राशीच्या लोकांवर कृपा - ज्योतिष शास्त्रानुसार धनु आणि मीन राशीच्या लोकांना शनिदेव जास्त त्रास देत नाहीत. जोपर्यंत या राशींची कर्मे चांगली असतात, तोपर्यंत शनिदेव त्यांना शुभफळ देतात. याशिवाय या राशीच्या सर्व लोकांनी शनिदेवाच्या नियमांचे पालन केल्यास या राशीचे लोक शनिदेवाच्या आशीर्वादास पात्र ठरतात आणि शनिदेवही या लोकांना मान-सन्मान आणि संपत्ती प्रदान करतात.

55

शनीची सर्वात आवडती राशी तूळ - ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की, शनिदेवाची सर्वात प्रिय राशी म्हणजे तुळ. तुळ राशीच्या लोकांनी इतरांचे भले केले तर ते त्यांच्या प्रगतीतला सहाय्यक ठरते. तुळ राशीच्या लोकांनी आपली कर्मे चांगली ठेवली तर शनीही त्यांना अनपेक्षित फळ देतो आणि त्यांना आयुष्यात उच्च पद प्राप्त होते. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

  • FIRST PUBLISHED :