आषाढ शिवरात्रीमध्ये कोणत्या 5 राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे, याविषयी श्री कल्लाजी वैदिक विद्यापीठाच्या ज्योतिष विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय तिवारी यांनी दिलेली माहिती पाहुया.
मेष : आषाढ शिवरात्रीच्या मुहूर्तावर मेष राशीच्या लोकांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे. वागण्या-बोलण्यावर संयम ठेवा, अन्यथा कोणाशी मोठा वाद होऊ शकतो. या दिवशी चिंतेमुळे तणाव वाढू शकतो. काही कारणांनी कामातील आत्मविश्वास आणि उत्साह कमी होऊ शकतो. भावनिकदृष्ट्या खंबीर राहण्याची गरज आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा.
मिथुन: या राशीच्या लोकांनी आषाढ शिवरात्रीला आरोग्याची काळजी घ्यावी. कुटुंबातील व्यक्तींशी वाद होण्याची शक्यता असल्याने कौटुंबिक जीवन तणावपूर्ण असू शकते. उधळपट्टीमुळे आर्थिक परिस्थिती तणाव देऊ शकते. चिंता आणि तणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी योग आणि प्राणायाम करणे योग्य ठरेल. ओम नम: शिवाय कालं महाकाल कालं कृपालं ओम नम: मंत्राचा जप केल्यास फायदा होईल.
तूळ: आषाढ शिवरात्रीला तुम्हाला व्यवसायात फायदा होऊ शकतो, पण तुमचे आरोग्य खराब होऊ शकते. बाहेरचे खाणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. रखडलेल्या योजनांमुळे मन अस्वस्थ राहू शकते. उत्साहाचा अभाव राहील व काम करावेसे वाटणार नाही. काम वेळेवर न झाल्यास आत्मविश्वास कमकुवत होईल. ओम नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने फायदा होईल.
वृश्चिक : तुमच्या राशीच्या लोकांनी आषाढ शिवरात्रीला कोणताही नवीन व्यवसाय किंवा प्रकल्प सुरू करू नये. व्यावसायिकांनीही अत्यंत काळजीपूर्वक गुंतवणूक करावी. या दिवशी तुमचे आरोग्य बिघडू शकते. कामाच्या ताणामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. ओम हौम ओम जूं स: मंत्राचा जप केल्याने शुभ परिणाम प्राप्त होतील.
मीन: शिवरात्रीला तुम्ही काल्पनिक जगात राहू शकता. खर्या गोष्टी सोडून तुम्ही काल्पनिक गोष्टींचे इमले बांधण्यात वेळ वाया घालवाल. वास्तवापासूनचे अंतर तुम्हाला नंतर त्रास देऊ शकते. तथापि, सर्जनशील क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा दिवस चांगला म्हणता येईल. ओम नमो शिवाय गुरु देवाय नम: या मंत्राचा जप करा.