हे मंदिर बिरभूममधल्या दुब्रजपूर भागात डांगळतळा इथं आहे. दररोज इथं भाविक दर्शनासाठी येतात. रविवारीही भाविक असेच मोठ्या संख्येनं आले होते. त्याचप्रमाणे सकाळी एक भाविक दर्शनासाठी आलेले असताना त्यांना देवीचे डोळे मिटलेले आढळले. नंतर ही बातमी वाऱ्याच्या वेगानं त्या भागात पसरली.
थोड्याच वेळात अनेक भक्तांनी हे पाहण्यासाठी गर्दी करायला सुरुवात केली. देवीच्या मिटलेल्या डोळ्यांचं हे दुर्मीळ दृश्य पाहायला भरपूर भाविक तिथं जमू लागले. मंदिरात सेवा करणाऱ्यांनीही ते दृश्य पाहिलं. या घटनेनंतर देवीच्या तोंडात पाणी घालण्यात आलं. त्यानंतर देवीचे डोळे उघडले गेले.
हा चमत्कार असल्याचं काही स्थानिकांचं म्हणणं आहे. कारण शनिवारी रात्रीपर्यंत देवीचे डोळे उघडे होते; मात्र त्याबाबत कोणीही ठोसपणे माहिती देऊ शकलेलं नाही. काहींच्या म्हणण्यानुसार, मूर्तीवरचा रंग देवीच्या डोळ्यात गेल्यानं ते मिटले गेले होते; मात्र देवीला पाणी दिल्यावर तो रंग निघाला व डोळे उघडले गेले असं त्यांचं म्हणणं आहे. या घटनेमुळे त्या भागात खूप गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय.
पश्चिम बंगालमधल्या हिंदू कुटुंबांमध्ये मनसा देवीचा उत्सव साजरा केला जातो. “पहाटे आम्ही आलो तेव्हा देवीचे डोळे मिटलेले असल्याचं आम्ही पाहिलं. या घटनेनंतर मंदिर परिसरात खूप गर्दी जमली होती. अशी घटना याआधी कधीच घडली नव्हती,” असं सागर डे या स्थानिक नागरिकाचं म्हणणं आहे.
देवी-देवतांच्या बाबत याआधीही अनेक चमत्कार घडले आहेत. अनेक भाविकांनी त्याचा अनुभव घेतला आहे. बंगालच्या मनसा देवीबाबत अशी घटना यापूर्वी घडली नसल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. मंदिर प्रशासनाकडून याबाबत काही सांगण्यात आलेलं नाही; मात्र या घटनेमुळे त्या भागात खळबळ माजली होती. भाविक झुंडीने देवीच्या दर्शनासाठी येत होते. हिंदू पुराणानुसार, मनसा देवी ही शेषनाग व वासुकी नागाची बहीण मानली जाते. त्यामुळे सापांपासून संरक्षण व्हावे, यासाठी मनसा देवीची आराधना व पूजा केली जाते. तसंच सुबत्ता व समृद्धता मिळावी यासाठीही देवीची प्रार्थना करतात.