NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / ..म्हणून हनुमान चालिसा पाठाचं इतकं महत्त्व; म्हणणाऱ्याच्या साक्षात मारुती राहतो पाठिशी

..म्हणून हनुमान चालिसा पाठाचं इतकं महत्त्व; म्हणणाऱ्याच्या साक्षात मारुती राहतो पाठिशी

Hanuman Chalisa Dohe: हनुमान चालिसाचे पठण केल्याने माणसाच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि पापांचा नाश होतो, असे मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार, हनुमान हे कलियुगातील असे देवता आहेत जे आजही पृथ्वीवर विराजमान आहेत. हनुमानाची मनोभावे पूजा केल्यास ते आपल्या भक्तांचे संकट दूर करतात.

16

ज्योतिष शास्त्रात, असे सांगितले आहे की हनुमान चालिसामधील काही कडवी आहेत, ज्याचा जप केल्यानं बजरंगबलीचा आशीर्वाद मिळू शकतो. याशिवाय या दोहेंचे (कडवे) पठण केल्याने माणसाची सर्व संकटे दूर होतात, असे मानले जाते. जाणून घेऊया हनुमान चालिसाचे ते दोहे आणि त्यांचा अर्थ.

26

अर्थ - या दोह्याचे मराठीत भाषांतर केले तर यात म्हटले आहे की, हे बजरंगबली, मी अज्ञानी आहे. मी तुझी उपासना करतो आणि स्मरण करतो, तू मला शक्ती, बुद्धी आणि ज्ञान देतोस आणि माझे संकट, दु:ख आणि अडचणी दूर करतो. ज्योतिष शास्त्रानुसार, या कडव्यांच्या ओळींचा जप केल्याने व्यक्तीला शक्ती, बुद्धी आणि ज्ञान प्राप्त होते. जर तुम्ही नोकरी किंवा मुलाखतीला जात असाल तर या श्लोकाचा जप केल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो आणि यश मिळते. असे मानले जाते की, हनुमानाच्या मूर्तीसमोर उभे राहून या मंत्राचा नियमित जप केल्याने लाभ होतो. जर हे नियमितपणे शक्य नसेल तर मंगळवार आणि शनिवारी किमान 108 वेळा या ओळींचे पठण केले पाहिजे. जप करताना तुळशीची माळ उत्तम मानली जाते.

36

हे बजरंगबली, तुझ्या नामाचे स्मरण करून भूत आणि पिशाच पळून जातात, असा या श्लोकाचा अर्थ आहे. एवढेच नाही तर वाईट शक्तींचाही परिणाम होतो. ज्योतिष शास्त्रानुसार या कडव्याच्या या ओळींचा नियमित जप केल्याने व्यक्तीच्या आसपास असलेल्या नकारात्मक शक्तींचा नाश होतो. रात्री भीती वाटत असेल तर झोपण्यापूर्वी हनुमान चालिसाच्या या ओळीचा जप करावा.

46

हे हनुमाना तुझ्या नावाचा जप केल्याने सर्व रोग आणि दोष दूर होतात आणि प्रत्येक व्यक्तीचे सर्व दुःख दूर होतात, असे या दोह्यात म्हटले आहे. शनिवारी या मंत्राचा जप केल्यानं रोग दूर होतात आणि मानसिक तणावातूनही आराम मिळतो.

56

या ओळींमध्ये म्हटले आहे की, मी मनाने आणि कृतीने हनुमानाचे ध्यान करतो, बजरंगबली मला सर्व संकटांपासून आणि अडथळ्यांपासून वाचवतो.

66

असे मानले जाते की, मंगळवार आणि शनिवारी या ओळींचा जप केल्याने व्यक्तीचे सर्व त्रास दूर होतात. याशिवाय या ओळींचा शनिवारी जप केल्यास कुंडलीतील शनि दोषापासून मुक्ती मिळते.

  • FIRST PUBLISHED :