NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / रिअल इस्टेट / या गावात राहण्यासाठी सरकारच देतंय 49 लाख रुपये; पाहा काय आहे ही जबरदस्त ऑफर

या गावात राहण्यासाठी सरकारच देतंय 49 लाख रुपये; पाहा काय आहे ही जबरदस्त ऑफर

या सुंदर गावात राहण्यासाठी तुम्हाला पैसे देण्याची गरज नाही तर तुम्हालाच पैसे मिळणार आहेत.

18

एखाद्या सुंदर ठिकाणी आपलं एक छानसं घर असावं असं स्वप्न प्रत्येकाचं असतं. पण त्यासाठी तसा पैसाही चांगलाच लागतो. त्यामुळे असं घर सर्वांनाच परवडत नाही. पण तुम्हाला अशाच सुंदर ठिकाणी कुणी राहण्यासाठी पैसे देत असेल तर...

28

असंच एक ठिकाण सध्या चर्चेत आलं आहे. जिथं राहण्यासाठी चक्क सरारच तुम्हाला पैसे देत आहे. एक-दोन लाख नव्हे तर तब्बल 49 लाख रुपयांची ही ऑफर आहे.

38

4,265 फूट उंचावर असलेलं हे गाव. बर्फाळ डोंगरातील हे गाव खूपच सुंदर आहे. या गावात राहण्यासाठी सरकार तुम्हाला पैसे देत आहे.   आता सरकार असं का करतं आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

48

गेल्या काही वर्षांपासून या गावातील लोक हे गाव सोडून जात आहे. इथं काही मोजकेच लोक राहत आहेत. या गावाची लोकसंख्या वाढवण्यासाठी सरकार 2018 सालापासूनच लोकांना पैसे ऑफर करत आहेत.

58

या गावात राहण्यासाठी £50,000 म्हणजे भारतीय चलनानुसार 49 लाख 26 हजारपेक्षाही ही जास्त किंमत आहे. चार सदस्यांचं कुटुंब असेल तर प्रत्येक प्रौढ सदस्याला £22,440 म्हणजे 22 लाख रुपये आणि लहान मुलांना £8,975 म्हणजे 8 लाख रुपये दिले जाणार आहेत.

68

जर तुम्ही या गावात दहा वर्षे राहिलात तर घराची किंमत वाढेल पण त्याआधीच ही जागा सोडली तर हीच रक्कम तुम्हाला परत द्यावी लागेल.

78

आता हे गाव कोणतं आहे हे जाणून घेण्याची तुम्हाला उत्सुकता आहे तर गाव आहे अल्बिनेन, जे स्वित्झर्लंडमध्ये आहे. वलाइस प्रांतात आहे. फ्रान्स आणि इटलीच्या सीमेवर आहे. 

88

मिररच्या रिपोर्टनुसार या गावात राहण्याच्या ऑफर्ससह काही अटीही आहेत. फक्त 45 पेक्षा कमी वयोगटातील लोकांसाठीच ही ऑफर आहे. अर्ज करणारा स्विस नागरिक हवा. ज्याला परमिट सी मिळालेलं असावं. (सर्व फोटो/सौजन्य - ट्विटर)

  • FIRST PUBLISHED :