राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे अनेक ठिकाणची वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. याचा मोठा फटका पुण्यालाही बसला आहे.
मुंबई बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर वडगाव बुद्रुक येथील मुठा नदी पुल परिसरात रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहतुक व्यवस्था ठप्प झालेली आहे.
नदी पुलापासून नवीन कात्रज बोगद्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
यामुळे वाहन चालक, नागरिक, कामगार, विद्यार्थी हैराण झाले आहेत.
वडगाव, धायरी, नऱ्हे, आंबेगाव परिसरातील सर्व सेवा रस्ते वाहतूककोंडी मुळे ठप्प झाले आहेत.
पाऊस सुरु असून पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.