NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / पुणे / आता पुण्यातही पुन्हा सुरू होणार Oxfordच्या मानवी चाचण्या

आता पुण्यातही पुन्हा सुरू होणार Oxfordच्या मानवी चाचण्या

DCGI (Drugs Controller General of India)ने परवानगी दिली की लगेच चाचण्यांना सुरूवात करू असं सीरमने म्हटलं आहे.

16

जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनावर औषध शोधण्यासाठी जगातले अनेक देश प्रयत्न करत आहेत. मात्र अनेक प्रगत देशांमध्ये कोरोना लशीच्या विरोधात आंदोलन उभं राहिलं असून WHOला त्याची दखल घ्यावी लागली आहे.

26

ब्रिटनच्या Medicines Health Regulatory Authority (MHRA)ने पुन्हा परवानगी दिल्याचं सांगितलं आहे. या निर्णयाला संशोधनाला मोठा फायदा होणार असून आता भारतासह जगभरात सुरू असलेल्या चाचण्या पुन्हा सुरू होणार आहेत.

36

या औषधाच्या चाचण्या या पूर्णपणे सुरक्षीत असल्याचं MHRAने म्हटलं आहे. ब्रिटनमध्ये एका व्यक्तीची प्रकृती बिघडल्याने या चाचण्या थांबिण्यात आल्या होत्या.

46

त्यावर तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल दिला असून त्यात चाचण्या पुन्हा सुरू करण्यास हरकत नाही अशी शिफारस केली आहे.

56

त्यामुळे DCGI (Drugs Controller General of India)ने परवानगी दिली की लगेच चाचण्यांना सुरूवात करू असं सीरमने म्हटलं आहे. पुण्यात या मानवी चाचण्या सुरू आहेत. त्या तात्पुरत्या थांबविण्यात आल्या होत्या. मात्र आता चाचण्यांचा मार्ग मोकळा झालाय.

66

भारतात पुण्यासह काही शहरांमध्ये या चाचण्या सुरू असून सीरम इन्स्टिट्यूट या लशीचं उत्पादन करणार आहे.

  • FIRST PUBLISHED :