गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे पुणेकरांची तारंबळ उडालीय. आज (मंगळवार) 25 जुलै रोजी पुणेकरांना सकाळीच ट्रॅफिक जामचा सामना करावा लागला.
पुणे विद्यापीठ रोडवरून शहराकडे जाताना वाहनांची प्रचंड कोंडी झाली होती. ब्रेमेन चौक ते विद्यापीठ चौक वाहतूक अतिशय सावकाश वाहनं सरकत होती. त्यामुळे नोकरदार, विद्यार्थी यांचे हाल झाले.
या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेले पुणेकर PMPML मधून खाली उतरुन पायी चालत निघाले.
आज अनेक राजकीय नेत्यांचा पुण्यात दौरा आहे. व्हीआयपी दौरे आणि पावसाच्या सरी याचा फटका रस्ते वाहतूकीला झाला. पुणे-मुंबई महामार्गासह शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली होती.
‘ट्रॅफिक जॅम’च्या बाबतीत पुणे जगात सहाव्या क्रमांकावर असल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. यापूर्वी मागच्या आठवड्यातही पुणेकरांना वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला होता.