आयसीसी वर्ल्ड कप 2023 भारतातील 10 ठिकाणांवर खेळवले जाणार असून यामध्ये अहमदाबाद, हैदराबाद, धर्मशाला, दिल्ली, चेन्नई, लखनौ, पुणे, बेंगळुरू, मुंबई आणि कोलकाता यांचा समावेश आहे.
46 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण 48 सामने खेळवले जाणार असून एकूण 10 संघ या स्पर्धेत उतरत आहेत.
महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन ठिकाणी आयसीसी वर्ल्ड कपचे सामने होणार असल्याने ही स्पर्धा याची देही याची डोळा पाहण्याची संधी महाराष्ट्रातील क्रिकेट प्रेमींना मिळणार आहे.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियम आणि पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर वर्ल्ड कपचे सामने खेळवले जाणार आहेत.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर वर्ल्ड कपचे एकूण 4 सामने खेळवले जाणार असून यात इंग्लंड विरुद्ध साऊथ आफ्रिका, बांगलादेश विरुद्ध साऊथ आफ्रिका, अफगाणिस्थान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, आणि सेमी फायनल 1 या सामन्यांचा समावेश आहे.
वानखेडेवर 21 ऑक्टोबर, 24 ऑक्टोबर, 7 नोव्हेंबर आणि 15 नोव्हेंबर रोजी वर्ल्ड कपचे सामने होणार आहेत.
पुण्यातील महाराष्ट्र असोसिएशनच्या क्रिकेट स्टेडियमवर वर्ल्ड कपचे 5 सामने खेळवले जातील. यात भारत विरुद्ध बांगलादेश, क्वालिफायर 2 विरुद्ध अफगाणिस्थान, साऊथ आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड, बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया, क्वालिफायर 1 विरुद्ध इंग्लंड या सामान्यांचा समावेश आहे.
पुण्यात 19 ऑक्टोबर, 30 ऑक्टोबर, 1 नोव्हेंबर, 12 नोव्हेंबर आणि 8 नोव्हेंबर रोजी हे सामने होणार आहेत.
हमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 19 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल. तर पहिला उपांत्य सामना 15 नोव्हेंबरला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर, तर दुसरा उपांत्य सामना 16 नोव्हेंबरला कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होणार आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर 15 ऑक्टोबर रोजी भारत पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना रंगणार आहे.