महाराष्ट्रातील लोकांना सोन्या-चांदीचे चांगलेच आकर्षण आहे. विशेषत: सण, उत्सव, घरगुती समारंभ यानिमित्त महिला वर्ग आवर्जून दागिन्यांची खरेदी करतो. गुंतवणुकीचा उत्तम मार्ग म्हणूनही सोन्याचा विचार केला जातो.
राज्यातील सोन्याचे भाव आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमाणे रोज बदलतात. त्यामुळे सोनं खरेदी करण्यापूर्वी ताजा भाव माहिती असणे आवश्यक आहे.
मराठी नववर्षारंभ मानला जाणारा गुढी पाडवा हा सण काही दिवसांवर आला आहे. या दिवशी महाराष्ट्रात सोन्या-चांदीची खरेदी केली जाते. त्यामुळे बदलणाऱ्या दरांवर सर्वांचेच लक्ष आहे.
पुणे शहरातील सोन्याची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. येथील दुकानांमध्ये दागिन्यांचे निरनिराळे ऑप्शन मिळतात. त्यामुळे ते खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते.
मार्चच्या सुरुवातीला सोन्याचे दर काही प्रमाणात उतरले होते. मात्र, होळीनंतर सोन्याच्या किंमतीमध्ये सातत्यानं वाढ झाली आहे.
पुण्यात काल (17 मार्च) ) 24 कॅरेट सोन्याचा दर 59778 तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 54974 रुपये प्रती तोळा इतका होता.
पुण्यात आज (18 मार्च) ) 24 कॅरेट सोन्याचा दर 61302 तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 56193 रुपये प्रती तोळा इतका आहे.
आज 1 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 6130 तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 5619 इतकी आहे.
पुण्यात चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. आजचा चांदीचा दर 73000 रुपये प्रतीकिलो आहे.
पुणे शहरातील हे सोन्याचे सर्वसाधारण दर आहेत. या किंमतीमध्ये ज्वेलरी, जकात शुल्क, राज्य कर, वाहतूक खर्च, GST या आणि अन्य कारणांमुळे बदल होऊ शकतो.