सोने खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण सुरू होती.
अर्थव्यवस्थेत सोन्याचं महत्त्व मोठं आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी हा बेस्ट ऑप्शन आहे.
सोन्याचे दर हे रोज बदलतात. त्यामुळे नवी खरेदी करण्यापूर्वी ताजे भाव माहिती असणे आवश्यक आहे.
पुण्याच्या बाजारपेठेत काल (9 मार्च) 24 कॅरेट सोन्याचा दर 56553 तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 51841 इतका होता.
पुण्यात आज (10 मार्च) 24 कॅरेट सोन्याचा दर 57011 तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 52260 आहे.
पुण्यातील सोन्याच्या घसरणीला ब्रेक लागला असून आज दर काही प्रमाणात वाढले आहेत.
आज (10 मार्च) 1 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 5701 तर 1 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 5226 इतका आहे.
पुण्यातील आजचा चांदीचा दर हा 67000 रुपये प्रतिकिलो आहे.
पुणे शहरातील हे सोन्याचे सर्वसाधारण दर आहेत. या किंमतीमध्ये ज्वेलरी, जकात शुल्क, राज्य कर, वाहतूक खर्च, GST या आणि अन्य कारणांमुळे बदल होऊ शकतो.