भारतात सण, समारंभ किंवा घरगुती कार्यक्रमांच्या प्रसंगी सोन्याची खरेदी केली जाते. गुंतवणुकीचा उत्तम पर्याय म्हणूनही सोन्याकडं पाहिलं जातं. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव रोज बदलतात.
पुणे शहरातील सोन्याची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. सध्या लग्नसराई असल्याने सराफा बाजारात मोठी गर्दी होताना दिसतेय. सोनं खरेदी करण्यापूर्वी ताजा भाव माहिती असणं आवश्यक असतं.
पुण्यात काल, 23 मे रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर प्रती तोळा 62,023 रुपये होता तर 22 कॅरेटचा 56,854 रुपये होता.
पुण्यात आज, 24 मे रोजी सोन्याच्या दरात आज वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा प्रती तोळा दर 62,332 तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 57,137 रुपये प्रती तोळा इतका आहे.
आज 1 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 6233 तर 1 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 5713 इतकी आहे.
पुण्यातील चांदीची बाजारपेठही प्रसिद्ध आहे. आजही चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. पुण्यात आजचा चांदीचा दर 70,213 रुपये प्रती किलो आहे.
पुणे शहरातील हे सोन्याचे सर्वसाधारण दर आहेत. या किंमतीमध्ये ज्वेलरी, जकात शुल्क, राज्य कर, वाहतूक खर्च, GST या आणि अन्य कारणांमुळे बदल होऊ शकतो.