डिजिटल घड्याळांच्या सध्याच्या जमान्यामध्ये अनेकांना आपल्या आजी-आजोबांकडील जुनी चावीची घड्याळं आठवत असतील.
ही घड्याळे तर त्यावेळेस अतिशय टिकाऊ म्हणून प्रसिद्ध तर असायचे. मात्र, अजूनही ती चालत आहेत याबद्दल अनेकांना विश्वास बसणार नाही
पुण्यातील गौतम दांडेकर हे 100 वर्षांहून अधिक जुने घड्याळे दुरुस्त देखील करतात आणि त्यांच्याकडे तब्बल साडेसहाशे जुन्या घड्याळांचे कलेक्शन आहे.
गौतम दांडेकर यांचं इंटिरिअर डिझाईनचं शिक्षण झालंय. पण आवड म्हणून ते गेल्या 20 वर्षांपासून चावीच्या घड्याळांची दुरूस्ती करत आहेत.
दांडेकर यांनी 1880 ते 1940 पर्यंतची बंद असलेली चावीची घड्याळे दुरूस्त केली आहेत. ते फक्त घड्याळे दुरुस्त नाही करत तर अशी चावीची जुन्या पद्धतीची घड्याळ देखील ते घरच्या घरीच तयार करतात.
दांडेकर हे उलट्या आकड्यांची घड्याळ बनवण्यासाठी देखील ओळखले जातात. त्यांनी बनवलेल्या या घड्याळांना चांगली मागणी आहे.
जगभरातील कोणतंही जुनं घड्याळ मी दुरुस्त करू शकतो, असा विश्वास दांडेकर यांनी यावेळी व्यक्त केला.