NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / पुणे / गटारीसाठी कायपण, पुण्यात परिस्थितीत गंभीर पण पुणेकर मटण घेण्यास खंबीर, पाहा हे PHOTOS

गटारीसाठी कायपण, पुण्यात परिस्थितीत गंभीर पण पुणेकर मटण घेण्यास खंबीर, पाहा हे PHOTOS

पुणे तिथे काय उणे असं उगाच म्हटलं जात नाही. शहरात पुन्हा लॉकडाउन लागू करण्यात आला. पण, आषाढ अमावस्या, त्यात रविवार आणि लॉकडाउन मधून मिळालेली निर्बंध शिथिलता, मग काय एकच गर्दी...

114

पुणे तिथे काय उणे असं उगाच म्हटलं जात नाही. कोरोनाची परिस्थितीत हाताबाहेर चालल्यामुळे शहरात पुन्हा लॉकडाउन लागू करण्यात आला. पण, आषाढ अमावस्या, त्यात रविवार आणि लॉकडाउन मधून मिळालेली निर्बंध शिथिलता..मग काय पुणेकरांनी सकाळपासूनच आखाड साजरा करायला मटण, चिकनची दुकाने गाठली.

214

मटण, तसा मांसाहारी खवय्यांच्या अगदीच जिव्हाळ्याचा विषय. मटणाचे नाव उच्चारले, तरी झणझणीत मसाला घालून बनवलेल्या चविष्ठ मटणाचे ताट डोळ्यासमोर तरळते, तोडांला अक्षरशः पाणीही सुटते.

314

काही भागात शारीरिक अंतर पाळून तर काही ठिकाणी गर्दी करून मात्र मास्क घालून किंवा रुमाल बांधून पुणेकर बाहेर पडले.

414

पुण्यात अनेक ठिकाणी महिला आणि पुरुषांची मटनासाठी रांगा लावल्यात. पुढे लॉकडाउन कायम असल्यामुळे पुणेकरांनी आजच्या दिवशी एकच गर्दी केली.

514

काही ठिकाणी पुणेकरांना तासभर रांगेत उभं राहावं लागलं, त्यानंतर मटन -चिकन खरेदी करता आलं.

614

श्रावण महिन्यात मास खाणं वर्ज्य असत त्यामुळे आज मटण खाण्याचा शेवटचा दिवस असल्याने आज मटणाच्या दुकानांवर लांबच लांब रांगा दिसून आल्या.

714

सकाळपासून आज मटनाच्या दुकानांवर गर्दी दिसून आली.

814

लॉकडाउनमध्ये अनेक लोकांनी मांसाहार टाळला होता. परंतु, आता अनलॉक झाल्यामुळे देखील गर्दी वाढली आहे.

914

कडक लॉकडाऊन मुळे 5 दिवस घरी कोंडून बसावं लागलं होतं पुन्हा उद्यापासून 4 दिवस सकाळी 8 ते 12 फक्त भाजीपाला आणि किराणा मिळणार म्हणून खवय्ये, मांसाहार प्रेमी आडवा हात मारायला सज्ज झाले आहे.

1014

तर गटारी करता ठाणेकरांनी पाळले सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळले. ठाण्यात मासांहार घेण्यास ठाणेकरांच्या रांगा लागल्या आहे.

1114

ठाण्यातील अनेक मासांहार दुकानात अगदी शिस्तबद्ध पद्धतीने ठाणेकर रांगा लावून मासांहार खरेदी करत होते.

1214

तर कोल्हापूरमध्ये आखाडी निमित्त मटन खरेदीला गर्दी पाहण्यास मिळाली. शहरातल्या अनेक मटन शॉप समोर ग्राहकांची गर्दी होती.

1314

उद्यापासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात कडकडीत लॉकडाउन लागू होणार आहे. त्यामुळे आज मटण, चिकन, मासे खरेदीला ग्राहकांनी एकच गर्दी केली.

1414

काही ठिकाणी तर लोकं नुसते मास्कच नाहीतर, हेल्मेट सुद्धा घालून रांगेत उभे होते.

  • FIRST PUBLISHED :