नाशिक आणि अमरावती पदवीधर तसेच औरंगाबाद, नागपूर, कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहे.
मात्र, नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या निकालाआधीच सत्यजीत तांबेंच्या विजयाचे पोस्टर लावण्यात आले आहे.
जीत सत्याची विजय नव्या पर्वाचा असे पोस्टर पुण्यात लावण्यात आले आहेत.
नाशिक पदवीधर मतदारसंघात भरघोस मतानी विजयी झाल्याबद्दल आमदार सत्यजीत तांबे यांचे हार्दिक अभिनंदन, असे पोस्टर पुण्यात लावण्यात आले आहे.
माजी नगरसेवक सन्नी निम्हण यांच्या नावाने हे पोस्टर लावण्यात आले आहेत.
पुण्यातील बानेर, चतुश्रुंगी भागात तांबेंसाठी निकालाआधीच बॅनरबाजी करण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे.