पुण्यातील घटनेने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त भरत गायकवाड यांनी पत्नीसह पुतण्याची गोळी झाडून हत्या केली.
पुणे शहरात पहाटे 4 च्या दरम्य़ान हा धक्कादायक प्रकार घडला. पत्नी मोनी गायकवाड (44) आणि पुतण्या दीपक गायकवाड (35) या दोघांची गोळी झाड़ून हत्या करण्यात आली.
अमरावतीत पोलीस दलात असलेले भरत गायकवाड शनिवारी सुट्टीसाठी पुण्यातील बाणेर बालेवाडी येथील घरात आले होते.
ही घटना घडली तेव्हा भरत गायकवाड यांच्यासह त्यांची आई आणि दोन्ही मुले घरात होती. पहाटे गोळी झाडण्याचा आवाज ऐकताच त्यांनी खोलीकडे धाव घेतली, मात्र तोपर्यंत सर्व संपलं होतं.
घटनास्थळाहून अद्याप कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. भरत यांनी हे पाऊल का उचललं याचा तपास केला जात आहे.